राजकारण हा सध्या खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्याने ढासळलेल्या राजकीय संस्कृतीची पुन:स्थापना करण्यासाठी आणि २०१९ मध्ये जे बिघडले आहे, ते सुधारण्यासाठी वैचारिक मतांची एकजूट करावी लागणार असून, सूडाच्या राजकारणातून कार्यकर्त्यांची जिरवण्याच्या संस्कृतीला थांबवण्याची जबाबदारी आता मतदारांवर आहे.विकले जाणारे राजकारण नको आहे.त्यामुळे कोरेगाव बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.कोरेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्य निवडणुकीसाठी महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलच्या प्रचारानिमित्त कोरेगाव येथे आयोजित सभेत रामराजे बोलत होते.यावेळी शशिकांत शिंदे,
वैयक्तिक द्वेष किती करायचा असा प्रश्न उपस्थित करून रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, कोरेगावची एक वैचारिक पातळी, राजकीय संस्कृती आहे. हे वैभव तुम्ही गमावून बसलेले आहात. विकले जाणारे राजकारण नको आहे. त्यामुळे मतदार म्हणून तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत. अन्यथा या जिल्ह्याचे बिघडलेले वळण कधीही सरळ होणार नाही.या जिल्ह्यामध्ये मी व शशिकांत शिंदे, आम्ही दोघांनीच उत्तरे द्यायची आणि बाकीच्यांनी निवांत राहायचे, असे किती दिवस चालणार असा राष्ट्रवादी काँग्रेस मधील नेत्यांच्या राजकारणावर असा परखड सवाल निंबाळकर यांनी यावेळी उपस्थित केला. शशिकांत शिंदे म्हणाले, कोरेगाव मतदारसंघात महाविकास आघाडी भक्कम करण्याच्या दृष्टीने बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवार दिले आहेत.
ॲड. विजयराव कणसे व मी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढलो आहे. पण आम्ही कधीही द्वेषाचे राजकारण केले नाही. विद्यमान लोकप्रतिनिधी मात्र प्रति मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत. छोट्या छोट्या गोष्टींवरून लोकांना नाहक त्रास दिला जात आहे. काल तर त्यांनी पालकमंत्र्यांसमोरच अधिकाऱ्यांना धमकी दिली. आपली एकत्रित ताकद विरोधकांना नेस्तनाबूत करेल, असा संदेश या निवडणुकीच्या माध्यमातून आपण देऊयात.