अजित पवारांना मोठा धक्का, रामराजे नाईक निंबाळकरांनी मार्ग बदलला; म्हणाले, “इथून पुढे मी…”

रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, “मी अजित पवारांना सोडणार की नाही हा वेगळा विषय आहे. पण मी…”

ramraje naik nimbalkar ajit pawar (1)
रामराजे नाईक निंबाळकर आता महायुतीचं काम करणार नाहीत! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Ramraje Naik Nimbalkar: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात जाणार असल्याच्या चर्चा चालू होत्या. खुद्द शरद पवारांनीही इंदापूरमध्ये भाषणात केलेल्या सूचक विधानामुळे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पक्षबदलाबाबत तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. आता खुद्द त्यांनीच यासंदर्भात स्पष्ट भाष्य केलं असून आता महायुतीबरोबर काम करण्याची आपली इच्छा नसल्याचं ते म्हणाले आहेत. त्यामुळे आता त्यांची पुढची राजकीय वाटचाल काय असेल? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून रामराजे नाईक निंबाळकर हे महायुतीमध्ये नाराज असल्याचं बोललं जात होतं. मध्यंतरी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्येदेखील आपली नाराजी पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्याकडे मांडणार असल्याचे सूतोवाच त्यांनी दिले होते. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीवरून या सगळ्या घडामोडींना सुरुवात झाल्यानंतर त्यांच्या नाराजीच्याही चर्चा सुरू झाल्या. त्यात इंदापूरमध्ये शरद पवारांनी केलेल्या विधानामुळे त्यात भरच पडली.

काय म्हणाले होते शरद पवार?

काही दिवसांपूर्वी इंदापूरमध्ये जाहीर कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांनी महायुती व भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. यावेळी शरद पवारांनी इथून पुढे १४ ऑक्टोबरला फलटणमध्येही असाच जाहीर कार्यक्रम असल्याचं आमंत्रण आल्याचा उल्लेख केला. त्यानंतर महाराष्ट्रभरात पुढच्या महिन्याभरात असे कार्यक्रम होतील, असेही सूतोवाच त्यांनी केले. त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर फलटणमधील कार्यक्रमात शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना बळ मिळू लागलं आहे.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे नाईक निंबाळकर शरद पवार गटात जाणार? इंदापूरच्या कार्यक्रमात व्यासपीठावरूनच केलं सूचक विधान!

काय म्हणाले रामराजे नाईक निंबाळकर?

रामराजे नाईक निंबाळकरांनी शुक्रवारी टीव्ही ९ शी बोलताना आपल्या आगामी राजकीय वाटचालीबाबत सूचक विधान करतानाच महायुतीचं काम इथून पुढे करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. “आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. हे कार्यकर्ते माझा शब्द शेवटचा मानून गेल्या ३० वर्षांपासून काम करत होते. प्रत्येकाला पटत होतं अशातला भाग नाही. फक्त मी सांगत होतो म्हणून ते करत होते. पण आज त्यांनी मला सांगितलं आहे की आम्ही आता महायुतीबरोबर नाही. माझा सगळ्यात धाकटा भाऊ संजीव राजेनंही मला हे सांगितलंय. त्यामुळे माझ्यासाठी आता यापुढे महायुतीसाठी काम करणं अशक्य आहे”, असं रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले आहेत.

पुढची राजकीय वाटचाल काय असेल?

“मी अजित पवारांना सोडणार की नाही हा वेगळा विषय आहे. मी शरद पवारांबरोबर जाणार की नाही हाही वेगळा विषय आहे. पण मी युतीबरोबर काम करणार नाही. महायुतीबरोबर राहण्याची आमची वा आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा नाही. ज्या पद्धतीने दोन-अडीच वर्षं या सरकारने आमच्या सबंध जिल्ह्यात प्रशासन व दोन ते तीन लोकांना हाताशी धरून ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसांना छळलं आहे, त्याविरुद्ध ही प्रतिक्रिया आहे एवढंच मी सांगेन”, अशा शब्दांत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्याच सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ramraje naik nimbalkar to join sharad pawar ncp left mahayuti ajit pawar faction pmw

First published on: 12-10-2024 at 08:33 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
Show comments