लोकसत्ता प्रतिनिधी
सातारा: पांचगणी टेबल लँड परिसरात एका पर्यटकाने रानगव्यांसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी रानगव्याशी हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न या पर्यटकांनी केला. रानगवा खवळल्याचे दिसताच पर्यटक पळून गेला. याच रागातून गव्याने परिसरात सकाळी फिरण्यासाठी (मॉर्निंग वॉकला) गेलेल्या स्थानिक नागरिंकावर जोरदार हल्ला केल्याचा प्रकार घडल्याचे वन विभागाच्या चौकशीत पुढे आले.
पाचगणी टेबल लँड परिसरात स्थानिक नागरिक व पर्यटक सकाळपासून फिरण्यासाठी जात असतात. पाचगणी आणि महाबळेश्वर या परिसरात मोठ्या प्रमाणात गवे आहेत. नव्याने पर्यटकांवर हल्ला केल्याचे कधीही ऐकिवात नाही. मात्र रविवारी सकाळी एका पर्यटकाने परिसरात सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या रानगव्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. तो आता या परिसरात सर्वांसाठी भीतीचा विषय ठरला आहे.
आणखी वाचा-कराड-चिपळूण रेल्वे प्रकल्पास अर्थसंकल्पात मंजुरीची मागणी, मध्य रेल्वे वरिष्ठ प्रबंधकांकडे निवेदन
रानगव्याच्या भीतीपोटी पर्यटक व स्थानिक टेबल लँडवर फिरण्यासाठी येण्यास तयार नाहीत. सर्वांसाठी सुरक्षितता हा महत्त्वाचा विषय आहे. मात्र रानगवा जंगलात निघून गेला आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा शोध घेतला असता तो कोठेही आढळून आलेला नाही.