चाळीसगाव येथे आयोजित राज्य बेसबॉल वरिष्ठगट स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नाशिक जिल्हा संघाची निवड जिल्हा बेसबॉल संघटनेचे अध्यक्ष अर्जुन टिळे यांनी जाहीर केली असून संघाच्या कर्णधारपदी रणजित शर्माची निवड करण्यात आली आहे. जिल्हा संघ पुढीलप्रमाणे रणजित शर्मा (कर्णधार), रुपेश जगताप (उपकर्णधार), तेजस सुरसे, दीपक तिवारी, नितीन पुजारी, भूषण गांगुर्डे, जयेश निखाडे, मनोज देशपांडे, बादल आढाव, राकेश बेंडकुळे, शरद पगारे, शंतनु घुले, प्रतीक जाधव, निरंजन गायकवाड, मिलिंद सनकर, ऋषीकेश पगारे. संघ मार्गदर्शक तथा व्यवस्थापक म्हणून राजू शिंदे यांची निवड झाली आहे. विद्याप्रबोधिनी येथे झालेल्या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेतून राजू शिंदे, राजू पाटील आणि अन्वर खान यांनी संघ निवड केली.

Story img Loader