एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत ४० आमदारांसह बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे यांनी भाजपाबरोबर जात सत्ता स्थापन केली. त्यामुळे शिवसेना पक्षात मोठी फूट पडली आहे. तेव्हापासून शिवसेना आमदार आदित्य ठाकरे ‘गद्दार’ म्हणत बंडखोर आमदारांवर टीका करत आहेत. तसेच, भाजपाच्या नेत्यांचाही ते समाचार घेत आहेत. यावर आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आदित्य ठाकरेंना सल्ला दिला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, “आम्ही कोणावर तुटून पडलो नाही. वयाचा एक भाग असतो. त्यांच्या वयोमानुसार त्यांनी वक्तव्य केली पाहिजे. तर, त्यांच्यावर भाजपाचा कोणताही नेता तुटून पडणार नाही. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री फडवणीस यांच्यावर पातळी सोडून बोलणं चुकीचं आहे.”

हेही वाचा : “…तो मर्द कसला”, शहाजी पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन एकनाथ खडसेंची टोलेबाजी; म्हणाले, “आमदार झाल्यानंतर त्यांची…”

अजित पवार मुख्यमंत्री होतील, असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे. यावर दानवे यांनी म्हटलं, “हा संख्याबळाचा खेळ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढत जास्तीचे आमदार आले तर, मुख्यमंत्री होऊ शकतात. लोकशाहीत ज्याच्या बाजूने जास्ती लोकं तो या राज्याचा आणि देशाचा राजा. त्यामुळे कोणाच्या बोलण्याने मुख्यमंत्री होत नसतो,” असा टोलाही दानवे यांनी राष्ट्रवादीला लगावला आहे.

Story img Loader