अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यापासून ते मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा रंगली आहे. आज ( २२ जुलै ) खासदार संजय राऊत यांनीही अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील, असं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाष्य केलं आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

“अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावरच मी सांगितलं होतं की, ते लवकरच मुख्यमंत्री बनतील. हे सांगणारा मी पहिला व्यक्ती होतो. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघे एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करतील,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.

हेही वाचा : उद्धव ठाकरे इर्शाळवाडीत, ग्रामस्थांना धीर देत दिलं ‘हे’ आश्वासन; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबद्दल रावसाहेब दानवे यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं. त्यावर रावसाहेब दानवे म्हणाले की, “आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. यात कोणताही बदल होणार नाही. पण, निवडणुकीनंतर राजकीय परिस्थिती पाहून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील नेते चर्चा करत निर्णय घेतील.”

हेही वाचा : “घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना मी अलीबाबाच म्हणणार कारण…”, आदित्य ठाकरेंची बोचरी टीका

“भाजपा कोणालाही धक्का देत नाही. ज्यांचा पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे, ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होतात. आम्ही कोणाचाही पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला नाही,” असं स्पष्टीकरण रावसाहेब दानवे यांनी दिलं आहे.