निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केले आहे. या निर्णयानंतर आता ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोग केंद्र सरकारचा गुलाम आहे. शिवसैनिकांनी खचून जाऊ नये. आपण पुन्हा लढू, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. तर हा लोकशाहीचा विजय आहे. हा बहुमताचा विजय आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. दरम्यान, भाजपाचे नेते तथा केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी निवडणूक आयोगाच्या या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> धनुष्यबाणानंतर मशाल चिन्हही जाणार? उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना उद्देशून मोठं विधान; म्हणाले, “कदाचित…”

असंगाशी संग करून त्यांनी सरकार स्थापन केले

“निवडणूक आयोगाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी की उद्धव ठाकरे यांची शिवसेना खरी याबाबतचा निकाल दिला. सारे पुरावे, सारे कायदे तपासूनच अशा प्रकारचा निकला देण्यात आला. २०१९ साली विधानसभा निवडणूक झाली. तेव्हाच्या निवडणुकीत सध्या जी शिवसेना भाजपासोबत आहे ती शिवसेना आणि भाजपालाच जनतेने कौल दिला होता. मात्र तेव्हा दगाफटका करून असंगाशी संग करून त्यांनी सरकार स्थापन केले,” असे दानवे म्हणाले.

हेही वाचा >>> उद्धव ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना खुले आव्हान, ‘मशाल’ चिन्हाचा उल्लेख करत म्हणाले; “मर्द असाल तर…”

संजय राऊतांच्या टीकेला आता फार महत्त्व…

“परंतु काही आमदारांना ते पसंद नसल्यामुळे बाहेर पडून त्यांनी आमचीच शिवसेना खरी आहे, असे सांगितले. कागदपत्रांच्या आधारे निवडणूक आयोगाने तसा निर्णय दिला. मला वाटतं की हा निकाल दोन्ही बाजुंनी मान्य केला पाहिजे,” असेही दानवे म्हणाले. तसेच संजय राऊत कोर्टावर टीका करतात. ईडीवर, सीबीआयवर टीका करतात . संजय राऊतांच्या टीकेला आता फार महत्त्व उरले नाही, अशी टाकीदेखील दानवे यांनी राऊतांवर केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raosaheb danve criticize sanjay raut while commenting on election commission decision on shiv sena party prd
Show comments