मुस्लिम आरक्षण परिषदेमध्ये माकडाची गोष्ट सांगत राज्यातील भाजप सरकारवर टीकेची झोड उठविणाऱया मजलिसे इत्तेहादुल मुस्लीमीनचे (एमआयएम) अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांना गुरुवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिले. माकडाच्या तोंडून दुसरे काय निघणार, अशी टीका दानवे यांनी ओवेसी यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली.
नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून ओवेसी यांनी राज्यातील भाजपवर केलेल्या टीकेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना दानवे म्हणाले, अशी अनेक माकडे आम्ही बघितलेली आहेत. त्याचबरोबर अशा अनेक माकडांचा आम्ही बंदोबस्तही केला आहे.
पुण्यातील सभेत बोलताना ओवेसी म्हणाले होते, की मुस्लीम समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टय़ा मागास असल्याचे अनेक आयोगांच्या अहवालातून सिद्ध झाले आहे. राज्य अल्पसंख्याक आयोगाने यावर शिक्कामोर्तब केले आहे. न्यायालयानेही मुस्लिमांचे मागासलेपण मान्य केले. त्यामुळे धर्माच्या नव्हे, तर मागासलेपणाच्या मुद्दय़ावर मुस्लिमांना आरक्षण हवे आहे. राज्य सरकारने मुस्लिमांसह इतर मागास समाजांना त्वरित आरक्षण दिले पाहिजे. यावेळी त्यांनी माकडाची एक गोष्टही सांगितली होती. तोच मुद्दा पकडून दानवे यांनी त्यांच्यावर टीका केली.
अमित शहांना सात महिन्यांत क्लीन चिट मग मुस्लीम तरुणांना वेगळा न्याय का? – असदुद्दीन ओवेसी

Story img Loader