अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (२३ ऑक्टोबर) औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रत्यक्ष शेतात जाऊन त्यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. आपल्या या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर कठोर शब्दांत टीका केली. शेतकऱ्यांनी सत्ताऱ्यांवर आसूड ओढावेत. त्यांना जाब विचारावा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यानंतर भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना काहीही काम केले नाही. शेतकऱ्यांनी त्यांच्यावरच अगोदर आसूड ओढावेत, असे दानवे म्हणाले. ‘टीव्ही ९ मराठी’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
हेही वाचा >>>>“आज केवळ घोषणांची अतिवृष्टी, अन् या निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ”; उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल!
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता बाहेर पडले आहेत. त्यांनी काही ठिकाणी आपला दौरा केला आहे. याचे श्रेय विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना द्यावे लागेल. मागील अडीच वर्षांत उद्धव ठाकरे मंत्रालयात गेले नाव्हते. राज्यात फिरले नाहीत. त्यांनी घरी बसून काम केले होते. राजा जोपर्यंत जनतेत जाणार नाही, तोपर्यंत त्याला जनतेचे दु:ख कळणार, हे आम्ही त्यांना सांगितले. पण ते घराच्या बाहेर पडले नाही. आपले कुटुंब आपली जबाबदारी एवढेच काम त्यांनी केले, अशी टीका दानवे यांनी केली.
हेही वाचा >>>> सत्तार म्हणाले ठाकरेंचा दौरा फक्त २४ मिनिटांचा, आता चंद्रकांत खैरेंचे जशास तसे उत्तर, म्हणाले “त्यांची सगळी लफडी…”
एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार फोडले. तेव्हा जनतेत गेल्याशिवाय जनतेचे समर्थन मिळत नाही, हे त्यांना समजले आहे. ते आणखी किती ठिकाणी दौरा करतील याबाबत कल्पना नाही. मात्र विरोधी पक्षातील माणूस जनतेत जाऊन प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे, ही चांगली बाब आहे. उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांनी आसूड दिला. हा आसूड सत्ताधाऱ्यांवर ओढावा असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मात्र मला वाटते की पहिला आसूड त्यांच्यावरच ओढायला हवा, असे रावसाहेब दानवे म्हणाले.
हेही वाचा >>>>काल अमित शाहांना शुभेच्छा दिल्यानंतर नाराजीच्या चर्चा, आज मिलिंद नार्वेकर थेट ठाकरेंच्या भेटीला
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना उद्देशून म्हणाले की , “काही झालं तरी तुम्ही धीर सोडू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत. आता रडायचं नाही तर लढायचं. संकटं येत असतात त्या संकटांना सामोरं जायचं. मी तुमच्यासोबत आहे. शिवसेना तुमच्यासोबत आहे. संकटं आली तेव्हा तुम्ही एक व्हा. तुमच्या हातातील आसूड हा केवळ हातात घेऊन फिरून नका, त्याचा योग्य वेळी वापरही करा.”