Raosaheb Danve News : निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून वसुली करायचे असं म्हटलं आहे. सचिन वाझेने माझ्याकडे यासंदर्भात पुरावे आहेत असं म्हटलं आहे. त्यानंतर आता शिवसेना उबाठा पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीसांवर आरोप करत आहेत. अशात भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve ) यांनी आमच्याकडे अनेक लेटरबॉम्ब आहेत असं म्हटलं आहे. तसंच विरोधकांवर टीका केली आहे.

काय म्हणाले रावसाहेब दानवे? (What Raosaheb Danve Said? )

“देवेंद्र फडणवीस यांनी समित कदम नावाच्या व्यक्तीला माझ्याकडे पाठवलं असं अनिल देशमुख यांनी सांगितलं होतं. समित कदम यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर हा सगळा वाद संपायला हवा होता. पण राष्ट्रवादीचे नेतेही देवेंद्र फडणवीसांवर आरोप करु लागले. देवेंद्र फडणवीस यांनी शांत राहण्यास सांगितलं होतं. तसंच तुमच्याविरोधात पुरावे आहेत म्हटलं होतं. आता सचिन वाझेने अनिल देशमुखांचे पीए पैसे घेत होते असं म्हटलं आहे.” असं रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve ) यांनी म्हटलं आहे.

Who is Abhinav Arora
Abhinav Arora: दहा वर्षांच्या आध्यात्मिक गुरूला बिश्नोई टोळीकडून धमकी, कुटुंबाचा दावा; व्हायरल व्हिडीओंमुळे आला होता चर्चेत
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Nirav Modi Letter of Understanding bank Business |
हिरा है सदा के लिये! – उत्तरार्ध
krushna abhishek govinda feud ended
अखेर ७ वर्षांनी वाद मिटला! जखमी गोविंदाची भाचा कृष्णा अभिषेकने घेतली भेट; म्हणाला, “मामींना भेटण्याची भीती…”
babita fogat claims aamir khan dangal movie two thousand crore collection
“दंगलने २ हजार कोटी कमावले अन् आम्हाला फक्त…”, बबिता फोगटचा मोठा खुलासा, म्हणाली, “माझ्या वडिलांनी…”
Aadinath Kothare
आदिनाथ कोठारे हनुमंत केंद्रेंपर्यंत कसा पोहोचला? म्हणाला, “मग मी नांदेडच्या…”
Nanand Bhabhi Relation
Nanand Babhi Relation : “भारतीय समाजात नणंद-भावजयांचं नातं खास”, न्यायाधीशांकडून मिश्किल टीप्पणी!
Mayuresh Wanjale
खडकवासला मतदारसंघातील समीकरणे बदलणार ?

पैशांच्या वाटा शोधल्या गेल्या पाहिजेत

“ईडीने कारवाई करुन पैसे अनिल देशमुखांकडे सापडले नसतील तर पैसे कोणत्या मार्गाने कोणत्या नेत्याजवळ पोहचले? त्याची चौकशी झाली पाहिजे. अनिल देशमुख मध्यस्थ आहेत, या प्रकरणाचा कर्ताधर्ता बाहेरचाच आहे. पैसे कुठे गेले त्याच्या वाटा शोधल्या पाहिजेत. सचिन वाझे आणि अन्य चौकडीच्या माध्यमातून हा शोध लागला पाहिजे” असं रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve ) म्हणाले.

हे पण वाचा- Devendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंना हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचताना पाहिलं तेव्हा..”, देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका

आमच्याकडे अनेक लेटरबॉम्ब पडून आहेत

“अनिल देशमुख यांच्या घराची झडती घेतली, तो पैसा सापडला नाही. याचा अर्थ पैसा आला, घेतला आणि दिला असा निघू शकतो. पैसे आले कुठून? दिले कुणाला हे समोर आलं. पण शेवटी तो गेला कुठे हे नाव गुलदस्त्यात आहे. मला वाटतं हा विषय संपलेला नाही. याला बऱ्याच वाटा फुटणार आहेत. हा फक्त एकच लेटरबॉम्ब होता, आमच्याकडे अनेक लेटरबॉम्ब पडून आहेत.” असं दानवे यांनी म्हटलं आहे. टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला त्यावेळी रावसाहेब दानवेंनी ( Raosaheb Danve ) हे वक्तव्य केलं.

Raosaheb Danve
रावसाहेब दानवे यांनी नेमकं काय काय म्हटलं आहे? वाचा देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेत त्यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक सज्जन गृहस्थ आहेत. जनतेच्या हिताचे निर्णय घेतात, तशा योजनाही राबवतात. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा त्यांना पाठिंबा आहे. असंही रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे.