गेल्या वर्षी जून महिन्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येनं आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे. बंडखोर आमदार सर्वप्रथम गुजरातमधील सुरत, त्यानंतर आसाममधील गुवाहाटी आणि मग गोवा असा प्रवास करत महाराष्ट्रात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर शिवसेनेचे खासदार, नगरसेवक, पदाधिकारी हेही शिंदे गटात सामील झाले. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा “काय झाडी, काय डोंगर, काय हाटील” हा डायलॉगही सोशल मीडियावर व्हायरल झाला.

हेही वाचा- Viral Video: “गेल्या अनेक महिन्यांपासून…”, ‘ब्रा आणि मिनी स्कर्ट’ घालून प्रवास करणाऱ्या तरुणीचं स्पष्टीकरण

या संपूर्ण प्रकरणावर एका मराठी तरुणाने रॅप बनवला आहे. त्याने आपल्या रॅपमधून शिंदे गटावर थेट हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातील सत्तांतरादरम्यान घडलेल्या विविध घटनांचा उल्लेख करत तरुणाने शिंदे गटाला धू धू धुतलं आहे.

मराठी तरुणाचा शिंदे गटावरील रॅप VIDEO

संबंधित रॅपचा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केला आहे. यावेळी जितेंद्र आव्हाडांनी “या तरुणाला अटक करू नका” अशी पोलिसांकडे विनंती केली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, “ह्या कलाकाराला सलाम… पोलिसांना विनंती, याला अटक करू नका.” संबंधित रॅप म्हणणारा तरुण तरुण नेमका कोण आहे? याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र, त्या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rap song on eknath shinde and 40 rebellion mla of shivsena jitendra awhad shared viral video rmm
Show comments