आश्रमशाळेतील अल्पवयीन मुलीस दोन दिवस शेतात डांबून बलात्कार केल्याचा प्रकार अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथे घडला आहे. बलात्कार करणारा युवक आणि त्याला मदत करणारे चारही जण हे आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थी आहेत.
अक्कलकुवा तालुक्यातील विरपूर येथील विद्यार्थिनी रविवारी वाण्याविहीरकडे येत असताना तिला पाच तरुणांनी अडवले. जवळील उसाच्या शेतात बळजबरीने ओढत नेत गणेश या संशयिताने बलात्कार केला. सलग दोन दिवस या मुलीला शेतात बांधून ठेवत अत्याचार करण्यात आले. अन्य चौघांनी या घटनेत संशयितास मदत केली. पोटात दुखू लागल्याची तक्रार मुलीने करताच भीतीमुळे संशयितांनी तिला रस्त्यावर सोडून दिले. घरी पोहचलेल्या मुलीने झालेला प्रकार नातेवाईकांना सांगितल्यानंतर मंगळवारी त्यांनी
अक्कलकुवा पोलीस ठाणे गाठले. परंतु त्रास होत असल्याने तत्काळ मुलीला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी मुलीचा जबाब नोंदविण्यात आल्यानंतर या प्रकरणातील पाचही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी आणि संशयित एकाच आश्रमशाळेत शिकत असल्याची माहिती पुढे येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा