सांगली : सांगलीतील बापट मळ्यात तस्कर जातीच्या बिनविषारी सापाचे ‘अल्बिनो’ पिल्लू लोकांच्या नजरेस पडले. मिरजेचे विघ्नेश यादव व नेचर कॉन्जर्वेशन सोसायटीचे वन्यजीव बचाव पथकाचे गौरव हर्षद यांनी त्याला ताब्यात घेऊन वन विभागाकडे सोपवले. ज्या प्राण्यांच्या शरीराचा रंग हा रंगद्रव्याच्या अभावी फिकट किंवा पांढरट असतो त्यांना ‘अल्बिनो’ असे संबोधले जाते. या प्राण्यांमध्ये रंगद्रव्याचा पूर्ण अभाव नसून फक्त कमतरता असते. त्यामुळे ते शुभ्र पांढरे न दिसता त्या प्राण्याच्या मूळ रंगापेक्षा फिकट रंगाचे असतात. काही जनुकीय बदलांमुळे त्यांच्या शरीरात जन्मतःच रंगद्रव्यांची कमतरता असते. यातील बऱ्याच प्राण्यांचे डोळे लाल किंवा गुलाबी रंगाचे असतात. पण सर्वांच्याच बाबतीत असे घडतेच असे नाही. दुर्दैवाने असे प्राणी निसर्गात फार काळ जगत नाहीत. कारण त्यांच्या फिकट रंगामुळे त्यांचे परभक्षी शत्रू आणि त्यांचे भक्ष्य असलेले प्राणी या दोघांनाही त्यांचा पटकन सुगावा लागतो.

हेही वाचा : “जयंतराव तुम्ही नकली वाघांबरोबर आहात, असली वाघांबरोबर या”, मुख्यमंत्री शिंदेंचा टोला

koyna dam water level
सांगली: कोयना ५ तर अलमट्टी धरणात १५ टीएमसी पाणी साठ्यात वाढ
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
pankaja munde manoj jarange
पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…

विविध प्रजातींच्या प्राण्यांच्या शरीरात निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या रंगद्रव्यांमुळे त्यांची त्वचा, केस, नखे, खवले इत्यादींना वेगवेगळे रंग प्राप्त होतात. सस्तन प्राणी आणि पक्षी यांच्यामध्ये मुख्यतः ‘मेलॅनोसाईटस् ‘ नावाच्या पेशी ‘ मेलॅनीन’ नावाचे रंगद्रव्य निर्माण करतात. तर मासे, साप व मगरींसारखे सरपटणारे प्राणी, बेडकासारखे उभयचर प्राणी यांच्यामध्ये ‘क्रोमॅटोफोर’ नावाच्या पेशी विविध प्रकारची रंगद्रव्ये निर्माण करतात. सापांच्या शरीराचा रंग हा मुख्यतः लाल रंगाचे एरीथ्रीन आणि पिवळ्या रंगाचे झॅन्थीन या दोन रंगद्रव्यांमुळे निर्माण होतो. सांगलीत आढळलेल्या अल्बिनो’ सापामध्ये ही रंगद्रव्ये कमी प्रमाणात असली तरी ती फिकट स्वरूपात स्पष्ट दिसून येतात. या सापाला वनखात्याच्या देखरेखीखाली निसर्गात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले.