सांगली : सांगलीतील बापट मळ्यात तस्कर जातीच्या बिनविषारी सापाचे ‘अल्बिनो’ पिल्लू लोकांच्या नजरेस पडले. मिरजेचे विघ्नेश यादव व नेचर कॉन्जर्वेशन सोसायटीचे वन्यजीव बचाव पथकाचे गौरव हर्षद यांनी त्याला ताब्यात घेऊन वन विभागाकडे सोपवले. ज्या प्राण्यांच्या शरीराचा रंग हा रंगद्रव्याच्या अभावी फिकट किंवा पांढरट असतो त्यांना ‘अल्बिनो’ असे संबोधले जाते. या प्राण्यांमध्ये रंगद्रव्याचा पूर्ण अभाव नसून फक्त कमतरता असते. त्यामुळे ते शुभ्र पांढरे न दिसता त्या प्राण्याच्या मूळ रंगापेक्षा फिकट रंगाचे असतात. काही जनुकीय बदलांमुळे त्यांच्या शरीरात जन्मतःच रंगद्रव्यांची कमतरता असते. यातील बऱ्याच प्राण्यांचे डोळे लाल किंवा गुलाबी रंगाचे असतात. पण सर्वांच्याच बाबतीत असे घडतेच असे नाही. दुर्दैवाने असे प्राणी निसर्गात फार काळ जगत नाहीत. कारण त्यांच्या फिकट रंगामुळे त्यांचे परभक्षी शत्रू आणि त्यांचे भक्ष्य असलेले प्राणी या दोघांनाही त्यांचा पटकन सुगावा लागतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा