राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या पाठोपाठ ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्य्यावरून राजकीय वातावरण तापल्याचं दिसत आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपाने ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात येण्यास राज्य सरकार जबाबदार असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं असून, भाजपाने चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. तर, आता काँग्रेसने देखील भाजपावर पलटवार करत, देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहेत. असं म्हटलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी, “आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपवण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश असून संघाच्या इशाऱ्यावर चालणारे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आरक्षण संपविण्यासाठीच काम करत आहे.” असा आरोप केलला आहे.
“ओबीसी समाजाचा विश्वासघात बंद करा, निवडणुका रद्द केल्या नाहीत तर …”
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपवण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश असून संघाच्या इशाऱ्यावर चालणारे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आरक्षण संपविण्यासाठीच काम करत आहे. देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहेत.” असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली आहे.
आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपवण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश असून संघाच्या इशा-यावर चालणारे केंद्रातील @narendramodi सरकार आरक्षण संपविण्यासाठीच काम करत आहे. @Dev_Fadnavis ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहेत. 2/3
— Nana Patole (@NANA_PATOLE) June 25, 2021
तसेच, “देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांना पत्र लिहून ओबीसींचा इम्पिरीकल डेटा देण्याची मागणी केली पण केंद्राने तो दिला नाही. केंद्राने ओबीसींचा डेटा दिला नाही, त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले.” असा असं देखील नाना पटोलेंनी म्हटलं आहे.
ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात येण्यास केंद्र जबाबदार : भुजबळ
“ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्याला सध्याचे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच जबाबदार आहे. ओबीसींचे हे राजकीय आरक्षण घालवून ओबीसी समाजाला सत्तेपासून वंचित ठेवण्याचा भाजपाचा डाव आहे. मोदी सरकार विरोधात २६ जून रोजी काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन करणार.” असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सांगितलं आहे.