लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोलापूर : मराठा आरक्षण प्रश्नावर सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा सोलापुरात स्वतंत्रपणे आंदोलन करीत असून यात मराठा क्रांती मोर्चा अधिक आक्रमक झाल्याचे दिसून येते. सोलापूर-पुणे महामार्गावर तसेच मंगवेढा मार्गावर रास्ता रोको आंदोलन करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला पेटते टायर टाकण्यात आले. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.

मंगळवेढा रस्त्यावर देगाव येथे रास्ता रोको आंदोलन होत असताना रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांब अंतरापर्यंत रांगा लागल्या होत्या. याच दरम्यान, एका रूग्णवाहिकेला मात्र पुढे जाण्यासाठी रस्ता मोकळा करून देण्यात आला. या आंदोलनात मराठा समाजासोबत वीरशैव लिंगायत, धनगर, मुस्लीम, कोळी, चर्मकार, मातंग आदी समाजघटकही सहभागी होते. सोलापूर-पुणे महामार्गावर उत्तर सोलापूर व मोहोळ भागात तीन ठिकाणी रास्ता रोको करून वाहतूक रोखण्यात आली. यावेळी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत जळते टायर रस्त्यावर फेकले होते.

आणखी वाचा-सांगली : सर्वपक्षिय बैठकीतील ठरावाची होळी

दरम्यान, मंगळवेढा शहरात बंद पाळण्यात आला असताना उत्तर सोलापूर तालुक्यात कोडी गावात गेल्या पाच दिवसांपासून सोमनाथ राऊत हे आमरण उपोषण करीत आहेत. बुधवारी गावात ‘चूल बंद’ ठेवून महिलांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. सकल मराठा समाजाच्यावतीने सोलापुरात सात दिवसांपासून साखळी उपोषण सुरू असून आंदोलकानी काही लोकप्रतिनिधींना जाब विचारत पिटाळून लावल्याचे प्रकारही घडले आहेत.

जिल्ह्यात सवळपास सातशे गावांमध्ये आंदोलन सुरू असून राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तर काही नेते आंदोलनात सहभागी होत आहेत.अकलूजमध्ये सुरू असलेल्या साखळी उपोषणात ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंबीय सहभागी झाले होते.