नाशिकचा बॉटनिकल गार्डन प्रकल्प खूप चांगला आणि नाविन्यपूर्ण आहे. हा प्रकल्प पाहून मी प्रभावित झालो असल्याची भावना ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी आज (सोमवारी) व्यक्त केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले. व संपूर्ण प्रकल्पाची त्यांना भेट घडवून आणली. टाटा यांचे सकाळी ओझर येथील विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता ते बॉटनिकल गार्डन येथे राज ठाकरे यांच्यासह पोहचले. संपूर्ण प्रकल्प त्यांनी अर्धा तास पाहिला. पत्रकारांशी मात्र ते काही बोलले नाही.
यावेळी फ्रावशी अकादमीचे अध्यक्ष रतन लथ, निमा, आयमा, बिल्डर असोसिएशन, उद्योजक, मनसेचे अविनाश अभ्यंकर, नाशिकचे महापौर अशोक मुर्तडक, मनसेचे शहराध्यक्ष व प्रदेश उपाध्यक्ष अॅड. राहुल ढिकले, डॉ. प्रदीप पवार, सलीम शेख या वेळी उपस्थित होते. यावेळी उद्योजकांनी नाशिकच्या विमानतळाचा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला तसेच उद्योगांबाबतही प्रश्न मांडले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा