रत्नागिरी : रत्नागिरीला जितका संपन्न वारसा लाभला आहे तितकेच आश्वासक वर्तमान आणि उज्ज्वल भविष्यही दृष्टिपथात आहे.  प्रगतीच्या वाटेवर असलेल्या रत्नागिरीच्या समृद्धतेची साक्ष देणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या कॉफी टेबल पुस्तकाचे आज, रविवारी राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> स्ट्रॉबेरी आता पांढऱ्या रंगातही! 

रत्नागिरी जिल्ह्याचा इतिहास, भौगोलिक वैशिष्टय़े, येथील संस्कृती, समाजजीवन, लोककला, साहित्य, शिक्षण, उद्योग अशा विविध विषयांवर या कॉफी टेबल पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे. मीनल ओक, डॉ. विवेक भिडे, दीपक गद्रे, आशुतोष बापट, ऋत्विज आपटे, प्रतीक मोरे, प्रशांत पटवर्धन, ज्योती मुळय़े, कॅ. दिलीप भाटकर, विनय महाजन, केदार फाळके, प्रमोद कोनकर, राजेंद्रप्रसाद मसुरकर यांच्या लेखांचा पुस्तकात समावेश असून जिल्ह्याच्या वैभवाच्या खुणा दर्शवणारी छायाचित्रेही त्यात असतील. या प्रकाशन सोहळयाच्या निमित्ताने ‘रत्नागिरी २०५०’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यात ‘एमआयडीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा यांच्यासह नामवंत उद्योजक सहभागी होणार आहेत. 

* कधी? रविवारी दुपारी ३.४५वा. 

* कुठे? हॉटेल ‘सिल्व्हर स्वान’, विश्रामगृहासमोर, माळनाका * कार्यक्रमासाठी पूर्वनोंदणी केलेल्यांनाच प्रवेश देण्यात येईल.