रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्याकडे महायुती सरकारमध्ये सध्या उद्योगमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. २०२२ मध्ये शिवसेनेत फुट पडल्यानंतर उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी झाले. उदय सामंत यांची रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर पकड आहे. २०१९ मध्ये सलग चौथ्यांदा ते या मतदारसंघातून विधानसभेवर निवडूण गेले. उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून २००४ आणि २००९ ची विधानसभा निवडणूक लढवली होती. या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांचा विजय झाला होता. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. २०१४ आणि २०१९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी शिवसेनेकडून लढवली. दोन्ही निवडणुकांमध्ये ते विजयी झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा