रत्नागिरी : भारतरत्न, दिवंगत पंतप्रधान, भाजपाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून भाट्ये येथे भाजपाच्या वतीने कलाकार अमित पेडणेकर यांनी वाजपेयींचे वाळूशिल्प साकारले. या वाळूशिल्पाचे अनावरण आमदार, भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांनी केले.
अमित पेडणेकर यांनी जवळपास ९ ते १० तास मेहनत घेऊन हे वाळूशिल्प साकारले. अटलबिहारी वाजपेयी यांचा चेहरा साकारताना भरपूर मेहनत घ्यावी लागली. त्या शेजारी भाजपचा रंगीत ध्वजही साकारण्यात आला. कलाकार अमित पेडणेकर यांचा सत्कार रविंद्र चव्हाण यांनी केला. कलाकार पेडणेकर यांचे विशेष कौतुक यावेळी करण्यात आले. यापूर्वी त्यांनी गेल्या वर्षी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर आणि दानशूर भागोजीशेठ कीर यांचे वाळूशिल्प साकारले होते. मूर्तीकार असणारे पेडणेकर हे उत्तम कलाकार आहेत.
हेही वाचा – औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्र एक नंबरलाच राहणार – उद्योगमंत्री उदय सामंत
या वेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, मंदार खंडकर, प्रदेश महिला सचिव शिल्पा मराठे, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, युवा मोर्चाचे प्रदेश सचिव विक्रम जैन, प्रशांत डिंगणकर, यांच्यासमवेत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.