रत्नागिरी : मुंबई – गोवा महामार्गावर सुरु असलेल्या रस्ते कामाची पुन्हा पोलखोल झाली आहे. रविवारी मुंबई गोवा महामार्गावरील खेड जगबुडी नदीवरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने खेड जगबुडी पुलावरची मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळासाठी थांबण्यात आली होती. दोन्ही बाजूकडील ही वाहतूक आता एकाच पुलावरून सुरु करण्यात आली आहे.
हेही वाचा – मुंबई : तासाभरात सर्वाधिक पाऊस कुर्ला परिसरात
खेड येथील जगबुडी नदीवरील पुलाला तडे जाऊन मोठे भगदाड पडल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती. या पुलाची पहाणी केल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र दुसऱ्या पुलावरून दोन्ही बाजूची वहातूक सुरु झाल्याने वहातूक कोंडी संपली. चिपळूण येथील बहादूर शेख नाक्यावरचा पुलाचा काही भाग कोसळला होता. तसेच डीबीजे महाविद्यालयाची भिंत कोसळली. आता या पुलाला भगदाड पडल्याने महामार्ग कामातील निकृष्टपणा वारंवार पुढे येऊ लागला आहे.