रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील ५८ रिक्त जागांच्या लेखी परीक्षेसाठी तब्बल ९५८ उमेदवार पात्र ठरले आहेत. येत्या बुधवारी (१३ एप्रिल) ही परीक्षा घेण्यात येणार आहे. गेल्या २९ मार्च ते ६ एप्रिल या काळात जिल्हा पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेची प्राथमिक फेरी पार पडली. त्यासाठी राज्यभरातून सुमारे आठ हजारांपेक्षा जास्त उमेदवारांचे अर्ज आले होते. त्यापैकी मैदानी चाचणीसाठी पात्र सुमारे तीन हजार उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून शारीरिक तपासणी व तंदुरुस्ती चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये कोणताही गडबड-गोंधळ होऊ नये म्हणून दररोज आठशे उमेदवारांची चाचणी घेण्यात आली. त्यांच्यासाठी नाश्ता व जेवणाची सोयही करण्यात आली होती. संपूर्ण भरती प्रक्रियेचे व्हिडीओ शूटिंग करण्यात आले. महिला पोलिसांसाठी एकूण ४२८ महिलांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ८३ महिला मैदानी चाचणीसाठी पात्र ठरल्या. त्यांची चाचणी गेल्या ६ एप्रिल रोजी घेण्यात आली. अशा प्रकारे भरती प्रक्रियेच्या प्राथमिक फेरीत एकूण सुमारे साडेचार हजार स्त्री-पुरुष उमेदवारांनी भाग घेतला. त्यापकी सुमारे तीन हजार उमेदवार पात्र ठरले. त्यातून गुणवत्ता यादीनुसार ९८३ जणांची लेखी परीक्षेसाठी निवड करण्यात आली आहे. येत्या बुधवारी ही परीक्षा होणार असून त्यानंतर निवडीचा अखेरचा टप्पा पूर्ण केला जाईल. सरकारी क्षेत्रातील अन्य कोणत्याही नोकरीप्रमाणे येथेही उपलब्ध जागा आणि इच्छुक उमेदवार यांचे प्रमाण अतिशय व्यस्त आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार एका जागेसाठी सुमारे १५ उमेदवार प्रयत्नशील आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा