दापोली : तालुक्यातील येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालय येथे चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याचा त्याच्याच वर्गातील ३ विद्यार्थ्यानी शारिरिक व मानसिक छळ करून रॅगिंग केल्याची तक्रार या विद्यार्थ्याने या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता यांचेकडे केली आहे.

दापोलीच्या कृषी महाविद्यालय चतुर्थ वर्षात शिकणारे ११ विद्यार्थी यांचा एक गट रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एका गावात कार्यरत होता. त्यातील एका विद्यार्थाला याच गटातील इतर तीन सहकारी विद्यार्थी त्रास देत होते. मात्र या विद्यार्थ्याच्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास होत असल्याने त्याने याबाबत त्यांना काहीच सांगितले नाही. त्याच्या या तीन सहकारी मित्रांनी या गावात प्रशिक्षण घेण्यासाठी गेल्यावर तिसऱ्या दिवसापासून या मुलाला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामध्ये अन्य सहकारी मित्र यांचेसमोर अंतर्वस्त्रावर नाचायला लावून त्याचा व्हिडीओ तयार करणे, रात्री उंट होण्यास सांगून चादर अंगावर टाकून मारहाण करणे, दारू पाजून गुप्तांगाला दोरी बांधून त्रास देत होते. असे या विद्यार्थ्याने कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता यांचेकडे केलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे.

unemployed youth cheated under mukhyamantri yuva karya prashikshan yojana
भंडारा : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील शेकडो बेरोजगारांची फसवणूक!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
Ministry of Statistics report reveals 25 6 percent youth deprived of education employment and skills
आजचे तरुण ‘बिन’कामाचे आणि ‘ढ’?
delhi school bomb hoax
४० हून अधिक शाळांना बॉम्बच्या धमक्या, पालकांच्या चिंतेत वाढ; नेमकं प्रकरण काय?
autoriksha
‘२०० रुपये जास्त मागितले, माराहाण करण्याची दिली धमकी’, रिक्षावाल्याने २० वर्षीय तरुणाला छळले, धक्कादायक घटनेचा Video Viral
viral video
VIDEO : असे विद्यार्थी मराठी शाळेतच घडू शकतात! संगणकालाही टक्कर देतात हे विद्यार्थी, अनोखी कला एकदा पाहाच
school girl and her brother molested by minors who threatened to kill her
जिवे मारण्याची धमकी देऊन शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य, अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल

हेही वाचा : विधानसभेला पाडायचे, की उभे करायचे हा निर्णय अंतरवालीतील बैठकीत – मनोज जरांगे

या तक्रारीची चौकशी करण्यासाठी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती. त्यात सदस्य म्हणून रावे कार्यक्रम प्रमुख डॉ. आनंद मयेकर , कार्यक्रम अधिकारी डॉ. जीवन आरेकर , सहाय्यक कुलसचिव आर.एस. गुजर यांचा समावेश आहे. या समितीने सर्व ११ विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली व मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे या विद्यार्थ्याला त्रास देणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी दोघांना रत्नागिरी जिल्ह्यातील एका तालुक्यात तर अन्य एकाला रायगड मध्ये दुस-या केंद्रावर पाठवण्यात आले असल्याची माहिती कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी यांनी दिली. या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे ही डॉ. जोशी यांनी सांगितले. पहिल्या समितीने रॅगिंगसंदर्भात अहवाल दिल्यास दुस-या समितीची स्थापना करण्यात येणार असून त्यामध्ये महाविद्यालयीन प्राध्यापकांसह पोलीस अधिकारी, स्वयंसेवी संस्थेचा प्रतिनिधी, तहसीलदार यांचाही समावेश असणार आहे. त्यामध्ये रॅगिंग झाल्याचे निश्चित झाल्यानंतर रॅगिंगप्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.

Story img Loader