रत्नागिरी : मत्स्य विभागाने एक जूनपासून मासेमारीसाठी बंदी लागू केलेली आहे. तरी देखील बंदी कायद्याचे उल्लंघन करुन मासेमारी करणाऱ्या रत्नागिरीतील तीन मासेमारी नौकांवर मत्स्य विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सदतीस हजार रुपयांचे मासे मत्स्य विभागाने जप्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – वाई, कराड उत्तरेत कामाला लागा – उपमुख्यमंत्री अजित पवार; साताऱ्यात पदाधिकाऱ्यांना सूचना

हेही वाचा – सातारा : कोयना धरण निम्म्यावर; जलसाठे भक्कमस्थितीत

मत्स्य व्यवसाय खात्याकडून दरवर्षी पावसाळ्यात मासेमारी बंदी करण्यात येते. एक जून ते एकत्तीस जुलै या कालावधीत ही बंदी लागू करण्यात येते. या कालावधीत मासे प्रजनन करीत असल्याने ही बंदी लागू करण्यात येत असते. मात्र ही बंदी धुडकावून रत्नागिरीच्या समुद्रात मजीद भाटकर आणि मुकद्दर बोरकर या दोघांच्या मालकीच्या तसेच जयगड समुद्रात लिना बिर्जे यांच्या मालकीच्या नौकांना पकडण्यात आले. या तिघांवर मत्स्य विभागाचे परवाना अधिकारी चिन्मय जोशी आणि स्मितल कांबळे यांनी कारवाई केली. याप्रकरणी सहाय्यक मत्स्य आयुक्तांच्या समोर लवकरच सुनावणी होवून तिन्ही नौका मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.