रत्नागिरी : रत्नागिरी शहरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांकडून तिघांना ताब्यात घेत ३५३ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. तसेच दोन दुचाकी, चार मोबाईलसह २ लाख २३ हजार ३५० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार हे रत्नागिरी शहरात गस्त घालीत असताना शहरातील पटवर्धन वाडी ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जाणारे रोडवर उद्यमनगर येथे तीन इसम दोन दुचाकीवर संशयित हालचाली करताना दिसुन आले. या संशयित इसमांची खात्री करता त्यांचेकडे गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला. याचे एकुण ३५३ ग्रॅम वजन आहे.
याप्रकरणी अत्ताउल्ला सलिम पटेल, (वय ३५), रा. उद्यमनगर, ता. जि. रत्नागिरी, फहाद मुस्ताक पाटणकर, (वय २७), शिवाजीनगर, ता. जि. रत्नागिरी, आयान अजिज मुल्ला, (वय २४), रा. उदद्यमनगर, ता. जि. रत्नागिरी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या तिघांविरूध्द अंमली पदार्थ कायद्यान्वये रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यावेळी तिघांच्या ताब्यातून ३५३ ग्रॅम गांजा व दुचाकी (एमएच ०८ एटी ६७९२) व (एमएच ०८ एव्ही ४६३०) व चार मोबाईल असा एकुण २ लाख २३ हजार ३५० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.