रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात २००६ ते सन २०२० या कालावधीत दाखल झालेल्या ११ विविध गुन्ह्यातील १०.०३३ किलोग्राम ‘गांजा’ व ३.९८ किलोग्राम ‘केटामाईन’ असा अंमली पदार्थांचा मुद्देमाल रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे शाखेने तळोजा, नवी मुंबई येथे नाष्ट करण्यात आला.
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य-मुंबई, यांनी एन.डी.पी.एस अॅक्ट १९८५ अंतर्गत दाखल गुन्ह्यातील जप्त मुद्दे माल नाश करण्याकरिता सर्व पोलीस अधीक्षक, यांना निर्देश केले होते. त्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ड्रग्ज डिस्पोजल समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. या ड्रग्ज डिस्पोजल समितीचे अध्यक्ष, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, हे असून या समितीच्या सदस्या ह्या अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड व राधिका फडके, पोलीस उपअधीक्षक, (मुख्यालय) अश्या आहेत.
आणखी वाचा-भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्याचा बछडा पडला विहिरीत
या समितीने रत्नागिरीतील एन.डी.पी.एस. कायद्या अंतर्गत दाखल गुन्ह्यातील मुद्दे माल नाष्ट करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरीला दिले होते. त्यानुसार शाखेकडून सन २००६ ते सन २०२० या कालावधीत गुंगी कारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ या कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यांपैकी एकूण १२ एन.डी.पी.एस. कायद्या अंतर्गत गुन्ह्यातील मुद्दे माल नाश करण्याबाबत न्यायालयाकडून आदेश प्राप्त करून घेण्यात आले व त्याप्रमाणे नमूद गुन्ह्यातील एन.डी.पी.एस. मुद्दे माल जाळण्याच्या पद्धतीने नाश करण्याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाकडे अर्ज करण्यात आले होते.