बारसू-सोलगाव रिफायनरीसाठी सर्वेक्षण सुरू केलं जाणार आहे, त्याला अनेक स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. सर्वेक्षणासाठीचं पथक सर्व साहित्यासह आज घटनास्थळी सकाळी पोहोचलं. त्याआधीच गावकरी तिथे ठिय्या मांडून बसले आहेत. दरम्यान, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. बारसूच्या माळरानावर कालपासून रिफायनरी विरोधक हजारोंच्या संख्येने जमले आहेत. कडक उन्हाची पर्वा न करता हे ग्रामस्थ इथे ठिय्या मांडून बसले आहेत. या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंदोलक गावकरी रिफायनरी प्रकल्प आणि सरकारविरोधात ते घोषणा देत आहेत. बेमुदत आंदोलन करण्याच्या तयारीनेच हे विरोधक माळरानावर दाखल झाले आहेत, कारण हे गावकरी जीवनावश्यक वस्तू सोबत घेऊन आले आहेत. दरम्यान, या आंदोलनावर मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बारसूतल्या लोकांना विश्वासात घेतल्यास विरोध दूर होईल, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला.

केसरकर म्हणाले की, जेव्हा एन्रॉन प्रकल्प कोकणात येत होता तेव्हादेखील स्थानिकांकडून त्या प्रकल्पाला विरोध झाला होता. परंतु एन्रॉन आल्यावर त्याचा काही परिणाम झाला नाही. बारसूतल्या प्रकल्पाच्या बाबतीत देखील तसंच होणार असेल, तिथली शेती आणि मासेमारीवर परिणाम होणार नसेल तर ती माहिती जनतेसमोर येण्याची गरज आहे. या लोकांना विश्वासात घेण्याची आवश्यकता आहे.

हे ही वाचा >> VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या बहिणीने पोलिसांना केली मारहाण, आधी धक्काबुक्की आणि मग अधिकाऱ्याच्या…

केसरकर म्हणाले की, येथील लोकांना विश्वासात घेतल्यास त्यांचा संभ्रम दूर होईल. रिफायनरी झाल्यावर तिथल्या आंबा आणि काजूच्या पिकांवर परिणाम होईल, असं लोकांना वाटतंय. तसेच रिफायनरीचं पाणी समुद्रात सोडल्यामुळे तिथल्या मासेमारीवर परिणाम होईल, अस गावकऱ्यांना वाटतं, हे गैरसमज दूर केले पाहिजेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ratnagiri refinery deepak kesarkar says if locals taken into confidence the objection to refinery will end asc