Ravi Rana On New CM Of Maharashtra : विधानसभा निवडणुकीत दमदार विजय मिळवल्यानंतर महायुतीतून भाजपाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांनी आज देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ पक्षनेता म्हणून निवड कली आहे. यानंतर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या युवा स्वाभीमान पक्षाचे नेते रवी राणा यांनी देवेंद्र फडणवीस सर्वात ताकदवान मुख्यमंत्री होणार असल्याचे म्हटले आहे. याचबरोबर एकनाथ शिंदे यांचे नाव घेत मुख्यमंत्रीपदाचे गणित सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले रवी राणा?

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि भाजपाचे गुजरातचे ज्येष्ठ नेते विजय रुपाणी यांच्या उपस्थितीत भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपाच्या आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ पक्षनेता म्हणून निवड केली आणि यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर पडदा पडला. या दरम्यान महायुतीचा घटक पक्ष असलेल्या युवा स्वाभीमान पक्षाचे प्रमुख आणि देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक असलेले आमदार रवी राणा म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस या राज्याचे सर्वात ताकदवान मुख्यमंत्री होणार आहे. मला वाटते की, देवेंद्र फडणवीसांचा चेहरा महाराष्ट्राच्या विकासासाठी गरजेचा आहे.”

हे ही वाचा : लग्नाचे आश्वासन, सोन्याचे दागिने अन्… ७२ वर्षांच्या वृद्धाबरोबर रायगडमध्ये काय घडले? मुंबईतील जोडप्याला हत्येच्या आरोपाखाली अटक

मुख्यमंत्रीपदाचे गणित

यावेळी महायुतीत मुख्यमंत्रीवरून झालेल्या रस्सीखेचीवर बोलताना रवी राणा म्हणाले, “देवेंद्र फडणवीस आधी मुख्यमंत्री होते, त्यानंतर ते उपमुख्यमंत्री झाले. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते ते उपमुख्यमंत्री होतील. राजकारणात ज्याचा हिस्सा जास्त असतो त्याला मुख्यमंत्रीपद मिळते आणि ज्याचा हिस्सा कमी असतो त्याला उपमुख्यमंत्रीपद मिळते. महायुती एकत्रपणे काम करत आहे, त्यामुळे ते आनंदाने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील.”

हे ही वाचा : “मंत्रीमंडळात आरपीएयचा मंत्री…”, रामदास आठवलेंची मोठी मागणी; अमित शाह म्हणाले…

कोण आहेत रवी राणा?

रवी राणा हे युवा स्वाभीमान पक्षाचे प्रमुख आहेत. ते २००९ पासून अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी प्रीती बंड आणि सुनील खराटे यांचा पराभव केला.

रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा २०१९ मध्ये अमरावतीतून अपक्ष म्हणून लोकसभेत निवडणून आल्या होत्या. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा भाजपाच्या तिकिटावर मैदानात उतरल्या होत्या. मात्र, यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. यामध्ये काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांच्यावर विजय मिळवला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi rana mla new cm of maharashtra devendra fadnavis eknath shinde navneet rana bjp aam