ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर भाष्य केलं आहे. ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह आणि शिवसेना नाव एकनाथ शिंदे यांना देण्यासाठी सुमारे २ हजार कोटींचा सौदा झाला, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला. राऊतांच्या या गौप्यस्फोटानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर आता आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

२ हजार कोटींच्या सौद्याबाबत विचारलं असताना रवी राणा म्हणाले, “संजय राऊत हे वैतागलेले आणि पिसाळलेले आहेत. यावर मी पुढे जास्त काही बोलणार नाही. कोण पिसाळतं? हे तुम्हाला माहीत आहे. हिंदुत्वाच्या विचारांवर शिवसेनेचे आमदार जेव्हा एकनाथ शिंदेंबरोबर गेले, तेव्हा राऊतांनी तुम्ही खोके घेतले, असा आरोप केला. पण आता सत्यमेव जयतेचा विजय झाला. निवडणूक आयोगानं बाळासाहेब ठाकरेंचा विचार असलेल्या एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण दिला आहे.”

Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Shahid Kapoor
“जवळच्या गोष्टींचा त्याग…”, ‘देवा’ चित्रपटासाठी शाहिद कपूरने केली ‘ही’ गोष्ट; म्हणाला, “एक कलाकार म्हणून…”
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
auto driver who rushed saif ali khan refused to disclose amount he got
जखमी सैफला रिक्षातून रुग्णालयात नेणाऱ्या चालकाला किती बक्षीस मिळालं? म्हणाला, “माझ्यासाठी तो…”
Ram Gopal Varma Gets Emotional after watching satya movie 27 years
“कंठ दाटून आला अन्…”, २७ वर्षांनंतर ‘सत्या’ चित्रपट पाहिल्यावर राम गोपाल वर्मा यांची ‘अशी’ झाली होती अवस्था; म्हणाले, “यशामुळे आंधळा…”
Hemant Dome
अमेय वाघ व हेमंत ढोमे यांच्यात अनेक वर्षे होता अबोला; खुलासा करत म्हणाले, “खूप भयानक…”

हेही वाचा- “कसबा आणि चिंचवडमध्ये भाजपा पराभूत होणार, हे अमित शाहांनी हेरलं”, रोहित पवारांचा टोला!

“बहुमताच्या आधारावर निवडणूक आयोगानं हा निकाल दिला. बहुमतावर आमदार, खासदार बनतात. बहुमतावरच सरकार बनतं. एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदारांचं ९५ टक्के बहुमत आहे. त्यामुळे त्यांना धनुष्यबाण मिळाला आहे. उद्या त्यांना शिवसेना भवन मिळेल. तसेच महाराष्ट्रात जेवढे शाखेचे कार्यालये आहेत, तेही एकनाथ शिंदे यांना मिळतील, कारण तिथे बाळासाहेब ठाकरेंचे विचार आहेत,” अशी प्रतिक्रिया रवी राणांनी दिली. ते अमरावती येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

हेही वाचा- उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार? मशाल चिन्हही काढून घेतलं जाणार? समता पार्टी आक्रमक

रवी राणा पुढे म्हणाले, “खोक्यांचा आरोप करणारे आणि नेहमी नामर्द म्हणणाऱ्या संजय राऊतांना माझा प्रश्न आहे, जेव्हा उद्धव ठाकरे यांनी या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचे पुतळे काढण्याचे आदेश दिले. तेव्हा तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर शिवाजी महाराजांचे पुतळे काढले. तेव्हा तुमची मर्दानगी कुठे गेली होती? तेव्हा तुम्ही नामर्द झाले होते. मर्दानगीच्या गोष्टी करणाऱ्यांनी आपण मर्द आहात की नामर्द आहात, हे पहिल्यांदा तपासून बघावं.”

Story img Loader