माजी मंत्री, आमदार बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला होता. यावरून बच्चू कडू आणि रवी राण यांच्यात ‘सामना’ रंगला आहे. त्यात ‘सत्तेतील दोन आमदार खोक्यांवरून भिडले आहेत,’ अशी टीका शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनी बच्चू कडू आणि रवी राणांवर केली होती. याला रवी राणांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’वरून बसून खोक्याचं राजकारण सुरु केलं. किशोरी पेडणेकरांनी आदित्य आणि उद्धव ठाकरेंना किती खोके पाठवलं हे संपूर्ण महापालिकेला माहिती आहे. खोक्याशिवाय यांचं पान हालत नव्हते. महापालिकेचा पैसा ठेकेदारांच्या घशात घालण्याचं काम त्यांनी केलं,” असा आरोप रवी राणांनी केला आहे.

हेही वाचा : ‘खोक्याचे पुरावे द्या, अन्यथा नोटीस पाठवणार’ म्हणणाऱ्या बच्चू कडूंना रवी राणांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “कोणी कितीही…”

“बाळासाहेबांचे विचार विसरून उद्धव ठाकरे काँग्रेसच्या विचारांवर चालत होते. बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार उद्धव ठाकरे आहेत. मात्र, विचारांचे वारसदार एकनाथ शिंदेंबरोबर असलेले आमदार आहेत. बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्यासमवेत आहेत,” असेही रवी राणांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi rana reply aaditya thackeray over bacchu kadu and ravi rana controversy ssa