गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचा आरोप अपक्ष आमदार रवी राणा यांनी माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावर केला होता. त्यावर १ तारखेपर्यंत रवी राणांनी पुरावे द्यावे. अन्यथा रवी राणांना नोटीस पाठवणार आहे, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. यावरती रवी राणांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
टीव्ही ९ मराठीशी बोलताना रवी राणा म्हणाले, “देवेंद्र फडणवीस माझे नेते आहेत. मला वाटतं कोण किती अल्टिमेटम देतं, त्याकडे मी लक्ष देत नाही. देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई दिली. अमरावती जिल्ह्यातीलशेतकऱ्यांना ५५४ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली. महाराष्ट्रात अनेक महत्वाचे निर्णय त्यांनी घेतले. त्यामुळे कोणी कितीही माझ्याविरोधात बोललं, कुठं आंदोलनं केली, तरी त्याची काळजी करत नाही. देवेंद्र फडणवीसांच्या पावलावर पाऊल टाकून मी काम करेन.”
हेही वाचा : “आता पार दुष्काळाचं वाटोळं…”, शिंदे-फडणवीसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया!
“मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस समजूत काढण्यासाठी बच्चू कडू आणि मला बोलवतील, तेव्हा मी जाईल. माझा कोणाशी वाद नाही, ही सिद्धांताची लढाई आहे. १५ वर्षापासून दिवाळीआधी गरिबांना किराणा वाटतो. त्यावर कोणीतरी चुकीची वक्तव्य करते किंवा माझ्याबद्दल खालच्यास्तरावर कोणी भाषा वापरत असेल, तर ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे,” असेही रवी राणांनी म्हटलं आहे.