हनुमान जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या मिरवणुकीवरून आमदार रवी राणा यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाला आणि काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. राणा म्हणाले ज्यांनी प्रभू श्रीरामाचा, भगवान हनुमंताचा अवमान केला, हुनमान चालीसा वाचण्यावरून खासदार नवनीत राणा आणि माझ्यावर राजद्रोह दाखल केला, आम्हाला तुरुंगात टाकलं, ते लोक धार्मिक सोंग करून हिंदू मतदारांचं लक्ष वेधून घेत आहेत. परंतु हिंदूंना यांचा खरा चेहरा माहिती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमदार राणा म्हणाले, हिंदूंना माहिती आहे की, ज्या मुख्यमंत्र्यांनी प्रभू श्रीरामाचा, भगवान हनुमानाचा विरोध केला. ज्या सरकारने हनुमान चालीसा म्हणणाऱ्या एका महिला खासदाराला तुरुंगात टाकलं, ही गोष्ट महाराष्ट्राची जनता कधीच विसरणार नाही. हनुमान जयंतीच्या मिरवणुकीबाबत राणा म्हणाले की, त्यांनीदेखील (महाविकास आघाडी) मिरवणूक काढली पाहिजे. पण मनापासून काढावी, केवळ निवडणूक डोळ्यासमोर हे सगळं करू नका.

हे ही वाचा >> पाकिस्तान भीषण संकटाच्या उंबरठ्यावर; ३५ टक्के महागाईचा दर कमी करण्यासाठी केंद्रीय बँकेचा मोठा निर्णय!

रवी राणा म्हणाले, तुमच्या रक्तात हिंदूत्व असलं पाहिजे. तुमच्या रगा-रगात, मनामनात हिंदुत्व असलं पाहिजे. आमच्या हनुमान चालिसाच्या कार्यक्रमाला सर्वांनी यावं. हनुमान चालीसाचा आवाज मातोश्रीपर्यंत, उद्धव ठाकरेंच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे. उद्धव ठाकरे जोवर हनुमान चालीसा पठण करत नाहीत तोवर त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत राहील हे नक्की आहे.