गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर नाराज असल्याची चर्चा आहे. पण, हे पेल्यातील वादळ असून, लवकर संपेल. बुलढाणा जिल्ह्यातील दोन पदाधिकाऱ्यांमध्ये वाद आहे, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटलं होतं. मात्र, याला आता रविकांत तुपकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. माझा कोणाशीही वाद नाही. नेतृत्वाच्या कार्यपद्धतीबद्दल आणि भूमिकेवर माझा आक्षेप आहे, असं सांगत रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांना लक्ष्य केलं. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

रविकांत तुपकर म्हणाले, “मी गेली अनेक वर्ष चळवळीत काम करतोय. घरावर तुळशीपत्र ठेऊन, पोलिसांचा मार खात २० वर्षे चळवळीत काम केलं आहे. महाराष्ट्रात चळवळ वाढवण्याचं काम आम्ही केलं. एवढे सगळं होऊनही ऐकून घ्यावे, अशी आमची भूमिका आहे. पण, ते सातत्याने होत नाही. म्हणून माझा आक्षेप नेतृत्वाच्या भूमिकेबद्दल आणि कार्यपद्धतीवर आहे.”

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
vidarbha parties prahar janshakti vanchit bahujan aghadi
लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर…”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हान
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड

“राजू शेट्टी यांनी विषयांतर करू नये”

“माझा जिल्ह्यातील कोणत्याही कार्यकर्त्याशी वाद नाही. जिल्ह्यातील नेत्याशी वाद करावा, एवढी प्रगल्भता मला आहे. महाराष्ट्र आणि जिल्ह्यातील कोणत्याही नेत्याशी माझा वाद नाही. नेतृत्वाच्या भूमिकेबद्दल आणि कार्यपद्धतीवर माझा आक्षेप आहे. विषयांतर करून विषयाचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. पण, राजू शेट्टी यांनी विषयांतर करू नये,” असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केलं.

हेही वाचा : केंद्र सरकारच्या तेल कंपन्यांच्या मदतीने कोकणात रिफायनरी -फडणवीस

“शेतकऱ्यांचा मोर्चा काढणे ही माझी चूक आहे का?”

“अनेक वर्षापासून मला संघटनेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न होत आहे. नेतृत्वाचे कान भरायचे, काहीतरी उलटसुलट सांगायचे, मग मी या पक्षात जाणार, त्या नेत्याला भेटलो, स्वतंत्र्यपणे मोर्चे काढले, असं सांगायचे. ५० हजार कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा मोर्चा काढणे ही माझी चूक आहे का?” असा सवाल रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला.

“विधानपरिषद न मिळाल्याचं दु:ख नाही”

“२०१४ साली चिखली मतदारसंघातून विधानसभेला निवडून येत असताना, नेतृत्वाने जागा मिळणार नाही सांगितलं. मी चळवळ टिकवण्यासाठी थांबलो. चिखलीच्या जागेसाठी तुझं बलिदान जातंय, म्हणून देवेंद्र फडणवीसांनी महामंडळाचे अध्यक्ष केलं. २०१९ साली लोकसभेच्या तयारी करण्यास सांगितलं. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या युतीत ती जागा सुटली नाही. नेतृत्व ती जागा घेण्यास अपयशी ठरले. त्याबदल्यात विधानपरिषद देणे ठरलं होतं. ती सुद्धा नाही मिळाली. मला विधानपरिषद न मिळाल्याचं दु:ख नाही,” असं रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : ठाकरे गटाचे पैशांवरच लक्ष!; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आरोप

“संघटना आम्हा सर्व कार्यकर्त्यांची आहे”

पक्षावर दावा करणार आहात का? असं विचारल्यावर रविकांत तुपकर म्हणाले, “माझ्या बोलण्याचे संदर्भ माध्यमांनी चुकीचे लावले आहेत. मी पक्षावर दावा करतोय, असं म्हटलं नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही प्रत्येक कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी करून वाढवली आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर ज्यांनी-ज्यांनी चळवळ वाढवण्याचं काम केलं. त्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा हक्क आणि अधिकार संघटनेवर आहे. त्यामुळे संघटना आम्हा सर्व कार्यकर्त्यांची आहे.”

“आता सर्वजण ऑफर देणार आहेत”

आशिष देशमुख यांनी भाजपात येण्याची खुली ऑफर दिली आहे. त्याबद्दल विचारल्यावर रविकांत तुपकर यांनी सांगितलं की, “याबाबत मला माध्यमांच्याद्वारे माहिती मिळाली. थेट माझ्याशी कोणीही संपर्क साधला नाही. आता सर्वजण ऑफर देणार आहेत.”

Story img Loader