स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकराच्या तडीपारीचा निषेध म्हणून गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १५ कार्यकर्त्यांनी मुंडन केले.
रविकांत तुपकर यांच्या तडीपारीचा दोन दिवसांपूर्वी आदेश पारीत करण्यात आला. त्यानंतर तुपकरांनी बुलढाणा सोडले. याचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अकरा वाजतापासून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी अर्धनग्न राहून सरकारच्या निषेधाच्या प्रचंड घोषणाबाजी करत तब्बल १५ जणांनी मुंडन केले.
यात युवा जिल्हाध्यक्ष संतोष राजपूत, विद्यार्थी संघटना राणा चंदन, अनिल पडोळ, समाधान धंदर, पालकर, हिरामन बिबे, फकीरा निकाळजे, राजू उबरहंडे, रामदास घोती, गजानन डुकरे हे, तर शे.रफिक, कडुबा मोरे, दत्तुमामा टेकाळे, मधुकर बाहेकर, शत्रुघ्न तुपकर, अनंत तुपकर, शिवा दाभाडे, शे. आमीन यांचा समावेश होता.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 22-02-2014 at 01:43 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravikant tupkar deportation