सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळ बैठकीच्या निमित्ताने साताऱ्यात शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे एकत्र आले. आमदार दिलीप वळसे पाटील या वेळी उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीचे आज आयोजन केले होते. यासाठी दोन्ही पवार येणार असल्याने उत्सुकता होती. या बैठकीसाठी शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील एकाच मोटारीतून आले.
तर अजित पवार हे रायगड येथील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट आणि सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी एकत्रित भोजनास उपस्थित राहिल्यानंतर या बैठकीसाठी आले. यांच्याशिवाय बैठकीस माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख, डॉ अनिल पाटील सर्व कार्यकारी मंडळाचे सदस्य उपस्थित आहेत.