नाही, होय म्हणत अखेर काँग्रेसचे माजी आमदार हाफीज धत्तुरे यांनी आपली बंडखोरी मागे घेत तलवार म्यान केली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आपण हा निर्णय घेतला असून धत्तुरे यांनी निवडणूक प्रचारापासून अलिप्त राहणार आहे असे सांगितले.
लोकसभेसाठी सांगली मतदारसंघात बहुरंगी लढती होत असून १७ उमेदवार िरगणात आहेत. हाफीज धत्तुरे यांनी काँग्रेस पक्षाकडे लोकसभेसाठी उमेदवारी मागितली होती. मात्र काँग्रेसचे विद्यमान खासदार प्रतीक पाटील यांनाच उमेदवारी जाहीर केल्याने धत्तुरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर दोन दिवस कार्यकर्त्यांशी बोलून त्यांनी उमेदवारी मागे घेतल्याचे शुक्रवारी रात्री जाहीर केले. मात्र तांत्रिकदृष्टय़ा त्यांची उमेदवारी कायम राहणार आहे.
सांगलीत धत्तुरेंची बंडखोरी मागे
नाही, होय म्हणत अखेर काँग्रेसचे माजी आमदार हाफीज धत्तुरे यांनी आपली बंडखोरी मागे घेत तलवार म्यान केली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आपण हा निर्णय घेतला असून धत्तुरे यांनी निवडणूक प्रचारापासून अलिप्त राहणार आहे असे सांगितले.
First published on: 06-04-2014 at 03:05 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rebellious back by dhatture in sangli