राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दांडग्या जनसंपर्काची महाराष्ट्राला कल्पना आहे. तसेच अनेकांना त्यांच्या स्मरणशक्तीचा प्रत्यय आला आहे. पवारांचं वय ८३ वर्षे इतकं आहे. तरी आजही ते कार्यकर्त्यांचे मेळावे, ग्रामपंयाचती, पंचायत समित्यांमध्ये जाऊन लोकांशी थेट संपर्क साधत असतात. अधून-मधून शेतकऱ्यांच्या बांधावर दिसतात. हेच पवारांच्या राजकारणातील यशाचं मुख्य कारण आहे, असं त्यांचे निटवर्तीय सांगतात. दरम्यान, आज (१४ जानेवारी) पुन्हा एकदा शरद पवारांनी त्यांच्या स्मरणशक्तीचा प्रत्यय दिला. पुण्यातल्या जुन्नर-आंबेगावमधील विघ्नहर सहकारी साखर कारखान्यातील आसवणी आणि इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारणीकरणाचा उद्घाटन समारंभ आज शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी भाषण सुरू करण्यापूर्वी घडलेला एक प्रसंग पाहून उपस्थितांनी शरद पवारांच्या स्मरणशक्तीला सलाम केला.

शरद पवार भाषणासाठी मंचावर उभे राहिले. तेवढ्यात गर्दीतून एक आवाज आला. हा कार्यकर्ता मोठ्याने घोषणा देत होता. शरद पवार यांनी एका क्षणात त्या कार्यकर्त्याचा आवाज ओळखला. शरद पवारांनी मंचावरून त्या कार्यकर्त्याचा नामोल्लेखही केला. हे पाहून उपस्थितांनी शिट्ट्या वाजवला आणि टाळ्यांचा कडकडाट केला.

Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
maharashtra election 2024 yogi adityanath fact check viral video
भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ बुलडोझर घेऊन उतरले मैदानात! लोकांना हात जोडून केलं मतदानाचं आवाहन? Video खरा पण…
Dhananjay Mahadik On Ladki Bahin Yojana
Dhananjay Mahadik : Video : “लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर..”, भाजपा खासदार धनंजय महाडिकांचं वादग्रस्त विधान
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
a young man paati goes viral on social media
“..तेव्हाच मंदिरातील माऊली प्रसन्न होईल” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO एकदा पाहाच
ramdas athawale poem for pm modi
VIDEO : “पंतप्रधान मोदी आहेत पळणारा चित्ता, म्हणूनच ते…”; रामदास आठवलेंची कवितेतून फटकेबाजी!
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
भाजपाच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेवरून शरद पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, “सत्ताधाऱ्यांची मानसिकता…”

शरद पवार त्यांच्या भाषणाला सुरुवात करणार इतक्यात एका कार्यकर्त्याने ‘पवार साहेबांचा विजय असो…’, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो…’ अशा घोषणा दिल्या. गर्दीतून ज्या दिशेने आवाज आला तिकडे बोट दाखवत शरद पवार म्हणाले, हे कोंढाजी वाघ आहेत ना? त्यावर उपस्थितांनी होकारार्थी उत्तर दिलं. शरद पवारांची स्मरणशक्ती पाहून उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. त्यावर शरद पवार म्हणाले, सभा कुठलीही असली तरी आपले कार्यकर्ते घोषणा देतातच. हे जुन्नरचं वैशिष्ट्य आहे.

सारखेसह इतर उद्योगांवर लक्ष देण्याची आवश्यकता : शरद पवार

शरद पवार भाषणात म्हणाले, एका नवीन प्रकल्पाला सुरुवात करण्यासाठी आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत. कार्यक्रमासाठी उशीर झाल्यामुळे मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. एक महत्त्वाची बैठक या कार्यक्रमाआधी असल्यामुळे मला उशीर झाला. त्या बैठकीला तमिळनाडू, झारखंड, बिहार, दिल्ली येथील मुख्यमंत्री उपस्थित होते. काँग्रेस खासदार राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि अनेक राष्ट्रीय नेते तिथे उपस्थित होते. त्या बैठकीत राष्ट्रीय विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यामुळे मला तिथे उपस्थित राहावं लागलं.

हे ही वाचा >> “दोन वेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला घेऊन…”, नाना पटोलेंचा शिंदे गट अन् मिलिंद देवरांना टोला

शरद पवार म्हणाले, आसवणी आणि इथेनॉल याचे जे प्रकल्प आपल्याकडे आहेत ते मोठे करण्याची गरज आहे. आपण उसाचा धंदा करतो. सुरुवातीला आपण उसाचे पीक घ्यायचे, त्यानंतर त्यापासून साखर तयार करतो. त्यानंतर साखर विक्रीला सुरुवात होते. साखर बनवल्यानंतर मळीपासून अल्कोहोल आणि त्यानंतर त्यात सुधारणा करून इथेनॉल आणि वीजही तयार करण्याचे काम केले जाते. यासह इतर उद्योग कसे वाढतील याचा विचार आम्ही करत आहोत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी येथे आंतरराष्ट्रीय परिषद चालू आहे. जवळपास १९ देशातील साखर तत्त्वज्ञान ज्ञात असलेले संशोधक तिथे उपस्थित आहेत आणि त्याबरोबरच पाच हजार लोक हे देशातून आणि देशाबाहेरून त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की साखर एके साखर करून चालणार नाही. इतर नवनवीन तंत्रज्ञान वापरून आपल्याला उसाचे पीक वाढवावे लागणार आहे. त्याबरोबरच उसापासून साखर तयार करण्यासाठी जो काही खर्च येतो तो कमी कसा करता येईल आणि त्यातून जी काही रक्कम मिळेल ती रक्कम सभासदांपर्यंत कशी पोहोचवता येईल, कामगारांपर्यंत कशी पोहोचेल या उपयोजना तेथे करण्यात येणार आहेत.