विधान परिषद सदस्यत्वासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांच्या नावाची शिफारस राष्ट्रवादी काँग्रेसने केल्याचे वृत्त येथे येताच पाटील समर्थकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. दुसरीकडे माजी खासदार शिवाजीराव माने यांचे राजकीय पुनर्वसन कोण करणार, याचीही चर्चा रंगली आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून एकदा विजयी झालेल्या पाटील यांचा नंतरच्या निवडणुकीत मात्र पराभव झाला. िहगोली मतदारसंघ काँग्रेसकडे सोडवून घेण्यास युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव सातव यांनी जोरदार प्रयत्न केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहमतीमुळे राष्ट्रवादीच्या ताब्यातील हा मतदारसंघ सातव यांना सुटला. मात्र, सूर्यकांता पाटील व त्यांचे समर्थक या निर्णयामुळे चांगलेच नाराज झाले होते.
लोकसभेच्या निवडणूक प्रचारात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सातव यांच्यासाठी आघाडीचा धर्म किती पाळला, याची उघड चर्चा लहान-मोठय़ा कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती. सातव यांना पाटील यांच्या नाराजीचा चांगलाच फटका बसला. निकाल जाहीर होईपर्यंत सातव यांना याचा अनुभव आला. सहा विधानसभा क्षेत्रांत झालेले मतदान व सातव यांचा काठावरचा विजय यात ही नाराजी दडल्याचे बोलले जाते. राज्यात सर्वत्र मोदी लाटेमुळे काँग्रेस पक्ष भुईसपाट झाला. मात्र, िहगोलीत राष्ट्रवादीच्या मी मी म्हणणाऱ्या काही पुढाऱ्यांनी खुलेआम सातव यांच्याविरोधात काम करूनही सातव यांचा पराभव करण्यात अपयश आल्याने निकालानंतरही चर्चेला फोडणी सुरूच होती.
लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसने स्वबळावर निवडणूक मदानात उतरावे, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार का? याचीही उत्सुकता आहे. परंतु सध्या तरी लोकसभेच्या नाराजीनाटय़ात राष्ट्रवादीने सूर्यकांता पाटील यांची विधान परिषदेच्या सदस्यपदी नियुक्ती करण्याची शिफारस राज्यपालाकडे केली. त्याचे
पाटील समर्थक कार्यकर्त्यांनी फटाके फोडून स्वागत केले.
सूर्यकांता पाटलांच्या नावाची विधान परिषदेसाठी शिफारस
विधान परिषद सदस्यत्वासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांच्या नावाची शिफारस राष्ट्रवादी काँग्रेसने केल्याचे वृत्त येथे येताच पाटील समर्थकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला.
आणखी वाचा
First published on: 31-05-2014 at 01:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recommend for legislative council of suryakanta patil name