नगर : राज्यात नव्या सहकारी संस्थांच्या नोंदणीचे काम काही वर्षांपासून बंद करण्यात आले होते, ते आता पुन्हा सुरू केले जाणार आहे. मात्र नव्या संस्थांना मंत्रालयातून मान्यता मिळणार आहे. यासाठी स्थानिक भाजपच्या जिल्हाध्यक्षांची शिफारस लागणार आहे, अशी घोषणा सहकार मंत्री अतुल सावे यांनी गुरुवारी नगरमध्ये पक्षाच्या बैठकीत केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोणत्याही सहकारी बँकेचे सभासदत्व पक्षाच्या कार्यकर्त्यांला हवे असल्यास माझ्याकडे या, मी मिळवून देतो, असेही ते म्हणाले. सहकार मंत्री अतुल सावे आज शहराच्या दौऱ्यावर होते. सकाळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सहकार विभाग व इतर मागासवर्गीय समाजासाठी असलेल्या योजनांचा आढावा घेतला. 

बाजार समित्यांच्या निवडणुका एप्रिल अखेरीस

 राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका ३० एप्रिलपर्यंत घेण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न आहेत. सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू असली तरी त्यामध्ये सकारात्मक भूमिका घेतली जाईल. बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकऱ्याला उमेदवारी करता येईल, त्यासाठी लवकरच आदेश काढला जाईल, अशी माहिती सहकार मंत्री सावे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

पतसंस्था, बँकांच्या चौकश्या प्रलंबित ठेवू नका

ज्या सहकारी पतसंस्था, नागरी बँकांच्या सहकार कलम ८३ व ८८ अन्वये चौकशी सुरू आहे, त्यांची त्वरित चौकशी पूर्ण करून कारवाई करावी. अशी प्रकरणे प्रलंबित ठेवू नयेत, अशी सक्त सूचना सहकार मंत्री सावे यांनी अधिकाऱ्यांना दिली. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या संस्था अवसायनात आहेत त्यांच्या निवडणूक प्रक्रिया येत्या तीन महिन्यात सुरू करावी, अशीही सूचना त्यांनी केली.