गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत ४६५१ मिमी पावसाची नोंद झाली होती, यावेळी पावसाने पाच हजारचा टप्पा ओलांडला आहे. लोणावळ्यात यावर्षी रेकॉर्डब्रेक पाऊस झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाऊस जास्त झाल्याने पर्यटकासह शेतकरी सुखावला आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत एकूण ४८५१ मिमी पावसाची नोंद झाली होती.पावसाच्या संततधारेमुळे तोच रेकॉर्ड यावर्षी मोडला गेला असून आत्तापर्यंत तब्बल पाच हजार १५२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात लोणवळामध्ये मुसळधार पाऊस पडत असून गेल्या २४ तासात ११८ मिमी पावसाची नोंद जाली आहे.
लोणावळा फक्त राज्यात नव्हे तर देशात नावाजलेले एक पर्यटनस्थळ राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक इथं दाखल होतात. लोणवळ्यातील निसर्ग, सहयाद्रीचा डोंगर, धबधबे, भुशी डॅम, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट हे बघण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. तीन महिने विशेषतः शनिवार-रविवार असेल किंवा सुट्टीचे दिवस असतील लोणावळा आणि परिसर हा हजारो पर्यटकांनी फुलून गेला होता. करोनाचा काळ आणि टोळबंदीनंतर पर्यटकांची गर्दीही लोणावळ्यात रेकॉर्डब्रेक वाढली आहे.राज्यात पावसाने जोर धरला असून लोणावळ्यातील यावर्षीचा पावसाच्या नोंदीचा आकडा हा आणखी वाढण्याची शक्यता आहे.