नंदुरबार : मिरचीचे आगार समजल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यात यंदा उत्पादन घटल्याने बाजार समितीत ७० टक्यांनी आवक कमी झाली आहे. परिणामी, लाल तिखटाचे भाव वाढण्याची शक्यता आहे.

मिरची सुकवून प्रक्रिया केल्यानंतर तिची लाल भुकटी बाजारात विक्रीसाठी आणली जाते. नंदुरबार बाजार समितीमध्ये सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मिरचीची आवक सुरु झाली. जवळपास तीन महिन्यात आतापर्यंत ४५ ते ५० हजार क्विंटल आवक झाली आहे. प्रारंभी ओल्या लाल मिरचीला २५०० ते चार हजार रुपये असा भाव मिळाला. सध्या तीन हजार ते ५१०० रुपये असा भाव मिळत आहे. जेमतेम दीड महिन्याचा हंगाम बाकी असून उर्वरित दिवसात ५० हजार क्विंटल आवक होण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा >>> जालना : बागेश्वरी साखर कारखान्यात स्फोट; दोन जागीच ठार तर दोन जखमी

मागील वर्षीच्या तुलनेत आवकमध्ये घटल्यामुळे भाव वाढल्याचे बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी सांगितले.

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात नंदुरबार जिल्ह्यात झालेला अधिक पाऊस मिरचीसाठी हानीकारक ठरला. या महिन्यांमध्ये मिरची फुलोरा अवस्थेत असते. त्याचवेळी सतत पाऊस सुरु राहिल्याने फुलगळ झाली. त्यातच निंदणी, कोळपणी ही कामे करण्यात अडथळा आला. परिणामी, रोगांचा प्रादूर्भाव वाढल्याने मिरचीच्या उत्पादनात घट झाली आहे. -पदमाकर कुंदे , विषय विशेषज्ञ, पीक संरक्षण विभाग, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार)

Story img Loader