जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या चोवीस तासात जोरदार पाऊस झाला. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला. महाबळेश्वर तालुक्यात सर्वाधिक पावसाची १९३ मि.मी. एवढी नोंद झाली. जिल्ह्य़ात एकूण ५८८ मि.मी.पाऊस नोंदवला गेला. सातारा येथे ७४, पाटण ९०, जावली ६२, तर खंडाळा येथे ६३ मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात ५३. ५ मि.मी. सरासरी पाऊस नोंदवला गेला. आजपर्यंत एकूण ५०२४ मि.मी. तर सरासरी ४५६ मि.मी.पावसाची नोंद झाली.

Story img Loader