जिल्ह्यातील पुनर्वसनाच्या प्रश्नांची यादी तयार करून माझ्याकडे द्या, सगळे प्रश्न बठक घेऊन मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी दिले.
येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी वांग-मराठवाडी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत अधिका-यांची बठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, पुनर्वसन अधिकारी धुमाळ, उपवनसंरक्षक प्रवीण, कार्यकारी अभियंता राजन येड्डीयार उपस्थित होते. या वेळी कदम यांनी प्रकल्पग्रस्तांची माहिती घेतली. पुनर्वसनाचे प्रस्ताव प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने पाठवावेत तसेच त्यासाठी लवकरात लवकर बठकीचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

Story img Loader