सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. यात महायुतीच्या नेत्यांच्या मुलांसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे निकटचे नातेवाईक आणि विश्वासू अनुयायांनीही उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांचे निकटचे नातेवाईक, ज्येष्ठ लेखक तथा केंद्रीय अबकारी शुल्क विभागाचे सेवानिवृत्त उपायुक्त नारायण महादेव तथा ना. म. शिंदे यांनी मोहोळ राखीव मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. त्यांचे वडील महादेव शिंदे हे स्वातंत्र्यसैनिक होते. तसेच २५ वर्षे सोलापूर नगरपालिका आणि नंतर महानगरपालिकेत नगरसेवक होते. याशिवाय सुशीलनिष्ठ माजी महापौर प्रा. सुशीला आबुटे यांनीही मोहोळ मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्यासाठी मुलाखत दिली आहे.

हेही वाचा – Petrol Diesel Rates Today : आज दसऱ्याच्या मुहूर्तावर वधारला का पेट्रोल-डिझेलचा भाव? तुमच्या शहरांत किती रुपये मोजावे लागणार?

हेही वाचा – Sayaji Shinde: ‘सत्याला नाही, सत्तेला धरा’, अजित पवार गटात प्रवेश होताच सयाजी शिंदेंचा जुना व्हिडीओ व्हायरल

मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघ महायुतीअंतर्गत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे असून, सध्या यशवंत माने हे या पक्षाकडून विधानसभेवर प्रतिनिधित्व करीत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीअंतर्गत जागावाटपामध्ये मोहोळची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे जाण्याची दाट शक्यता असल्यामुळे या पक्षाकडे इच्छुकांची गर्दी झाल्याचे बोलले जाते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relatives of sushilkumar shinde are also interested in sharad pawar group ssb