ज्या योजना होऊ घातल्या आहेत, त्या पूर्णत्वास नेण्यासाठी आणि देशाचा सर्वागीण विकास साधण्यासाठी आघाडी सरकारची सत्ता आली पाहिजे. त्यामुळे साताऱ्यातून उदयनराजे आणि राज्यभरातून आघाडीचे उमेदवार बहुमताने निवडून देऊन इतिहासाची पुनरावृत्ती करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
खंडाळा येथे राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष रामराजे नाईक-िनबाळकर, पालकमंत्री शशिकांत िशदे, उदयनराजे, आमदार मकरंद पाटील, मुंबई बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, शंकरराव गाढवे, बकाजीराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप येळगावकर, सुनील माने आदींची उपस्थिती होती.
पवार म्हणाले की, मी आत एक आणि बाहेर एक, अशी औलाद नाही. जे आहे ते स्पष्ट बोलतो. कोणीही काहीही समज करून न घेता, आपल्याला उदयनराजेंचे काम करायचं आहे. सोशल मिडिया वरून जाहिरातबाजी होत आहे. मोदींकडे एवढे पसे आले कोठून हे विचारणार कोण, देशाची अखंडता, जातीय सलोखा टिकवण्यासाठी आणि देशाची प्रगती साधण्यासाठी केंद्रात यूपीए सरकार आले पाहिजे. मोदी यांनी गुजरातमध्ये काय केले, गोध्रा कांड झाले, साधे सांत्वनही मोदींनी केले नाही. आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले. पुरावे आहेत का? तुमच्यातील अनेकांनी भ्रष्टाचार केला. त्यांना पदावरून हाकलण्यात आले. कर्नाटकचे येडीयुरप्पा यांचीही हकालपट्टी झाली. मात्र आता त्यांना गोमूत्र शिंपडून पुन्हा पक्षात का घेतले, याचे उत्तर कोण देणार, आदी सवाल पवार यांनी उपस्थित केले.
शिवसेना आणि मनसेच्या वादावरही पवार यांनी टीकेची झोड उठवली. ही निवडणूक लोकशाहीची आहे. तुमची घरगुती भांडणे चार िभतीच्या आत सोडवायला हवी होती. बाळासाहेबसुद्धा स्वर्गातून या दोघा भावंडांना काय म्हणत असतील? कोण म्हणतो बाळासाहेबांना तेलकट वडा दिला म्हणून मी चिकन सूप पाजलं. कोण म्हणे तुझी औकात काय तर दुसरा म्हणे माझी औकात दाखवतोच. एक म्हणे पाठीत खंजीर खुपसला. अरे चाललय काय? आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करतो. अपुरी कामे आणि योजना पूर्णत्वाला नेण्याची धमक आणि ताकद फक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्येच आहे. त्यामुळे आघाडीचे सर्व उमेदवार बहुमतांनी निवडून द्यावेत, असे आवाहन पवार यांनी केले. यावेळी रामराजे, ना. िशदे, उदयनराजे, आ. मकरंद पाटील आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकत्रे उपस्थित होते. 

Story img Loader