पवार यांच्याविरुद्ध एकही गुन्हा नाही!
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याविरुद्ध एकही गुन्हा दाखल नसल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिल्लीला पाठवली आहे. पोलीस संरक्षण पुरविण्यात आलेल्या व्यक्तींची माहिती सर्वोच्च न्यायालयाला सादर करण्यासाठी ही माहिती मागवली असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
पवार यांच्या विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्य़ाची माहिती तत्काळ देण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते. याबाबत बुधवारी पुणे पोलिसांनी निवेदनात प्म्हटले आहे की, संरक्षित व्यक्तींना पुरविण्यात येणाऱ्या संरक्षणासंदर्भाची माहिती सर्वोच्च न्यायालयास सादर करायची असल्याने दिल्ली पोलिसांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याविरूद्ध दाखल गुन्ह्य़ांची माहिती मागितली होती. त्यानुसार पवार यांच्याविरुद्ध एकही गुन्हा दाखल नसल्याची माहिती देण्यात आली आहे, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. याबाबत मंगळवारी रात्री पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्याशी संपर्क साधून पवार यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्य़ांची माहिती पाठविण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहेत का, याबाबत विचारणा केली असता त्यांनी, अशी कोणतीही माहिती गोळा केली जात नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, याबाबतच्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर बुधवारी पुणे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रक काढून, सर्वोच्च न्यायालयाकडून दिल्ली पोलिसांना ही माहिती मागविण्यात आली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा