न्यायवैद्यक प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार भंडारा जिल्ह्यातील तीन अल्पवयीन मुलींवरील बलात्कार-खून प्रकरणातील मुलींचा विहीरीत बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. भंडारा जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील सहा, नऊ आणि अकरा वर्षांच्या मुलींचे १४ फेब्रुवारीला विहिरीत मृतदेह सापडले होते. तेव्हा करण्यात आलेल्या शव विच्छेदनाच्या अहवालात या मुलींवर बलात्कार करुन खून केल्याचे नमूद करण्यात आले होते. परंतु त्यानंतर न्यायवैद्यक प्रयोगशाळे मार्फत करण्यात आलेल्या चाचणीत या मुलींच्या शरीरावर कोणत्याही जखमा झाल्या नसल्याचे तसेच त्यांना विषही देण्यात आले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या घटनेसंदर्भात अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.  

Story img Loader