Republic Day 2024 Parade : संपूर्ण भारतात आज ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. त्यामुळे आपण आज प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात आयोजित केलेल्या महत्त्वाच्या कार्यक्रमांची माहिती घेणार आहोत. तसेच मनोज जरांगे पाटील यांचा मराठा मोर्चा आज मुंबईत दाखल होत आहे. या आंदोलनावरही आपलं लक्ष असेल. या आंदोलनाशी संबंधित बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील. मुंबईकरांची आणि मराठा समाज आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी चर्चेसाठी यावे. आरक्षणाची मागणी मान्य करावी. आम्हाला आडमुठेपणा करायचा नाही मात्र, आझाद मैदानावरच उपोषण करणार, असा निर्धार मनोज जरांगे पाटील व्यक्त केला आहे.

Live Updates

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर

11:38 (IST) 26 Jan 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.

पंतप्रदान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांसह नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.

https://twitter.com/ANI/status/1750741753341280305

10:33 (IST) 26 Jan 2024
प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा

आज भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्ताने राज्यातील जनतेला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांना माझं वंदन. महाराष्ट्र हे भारताचं ग्रोथ इंजिन आहे. हे स्थान टिकवण्यासाठी मागील दीड वर्षांच्या काळात महायुती सरकारने आपलं कर्तव्य जबाबदारीने पार पाडलं, हे मी अभिमानाने या ठिकाणी सांगतो. सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, सांस्कृतिक क्रीडा या सर्वच आघाड्यांवर महाराष्ट्राने आपली छाप टाकण्यास सुरुवात केली आहे महाराष्ट्रात एक छोटा भारत वसलेला आहे असा आपण म्हणतो आणि त्यामुळेच भारताच्या प्रगतीची पताका डौलाने फडकत ठेवण्यासाठी आपली एकजूट महत्वाची आहे

10:28 (IST) 26 Jan 2024
“झोपेत असताना पोलिसांनी कागदावर सह्या घेतल्या..”, मनोज जरांगे पाटील यांचा आरोप

लोणावळ्यात मी झोपेत असताना कुणीतरी अधिकारी माझ्याकडे आले. त्यांनी कोर्टाचा कागद असल्याचं सांगत माझी सही घेतली. आम्ही कोर्टाचा मान ठेवतो, त्यामुळे मी सही केली. त्यात एक मराठी कागद आणि एक इंग्रजी कागद होता असं आता मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. माझ्यासह इतर नऊ जण असल्याचं सांगत फसवून सही घेण्यात आली. या सहीचा दुरुपयोग कुणी केला तर गाठ माझ्याशी आहे असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत जाण्यावर आपण ठाम असल्याचं म्हटलं आहे. आज सकाळी त्यांनी झेंडावंदनही केलं. ज्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आम्ही काही वेळात सरकारच्या शिष्ट मंडळांशी चर्चा करणार असल्याचं म्हटलं आहे.

सविस्तर वाचा

Manoj Jarange Patil

मनोज जरांगे आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळातील चर्चा चर्चा निष्फळ

महाराष्ट्र सरकारच्या दोन शिष्टमंडळांनी लोणावळ्यात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरल्याने जरांगेंची यात्रा दुपारी ३ वाजता मुंबईच्या दिशेने निघाली. वाशी येथे गुरुवारी रात्री मुक्काम केल्यानंतर शुक्रवारी (२६ जानेवारी) सकाळी त्यांची पदयात्रा मुंबईकडे रवाना झाली आहे. मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावरच आमरण उपोषण करण्यावर जरांगे ठाम आहेत.