रिपब्लिकन पार्टी ऑफ इडियाला पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी दोन खासदारांची आवश्यकता आहे. यासाठी आम्ही शिर्डी व सोलापूरच्या जागेचा आग्रह धरला असून भाजपने नवे मित्र मिळाल्यावर जुन्या मित्रांना विसरु नये असे केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत सांगितले.
हेही वाचा >>> मंगळवेढ्यात सरकारी इमारत हडपण्याचा प्रकार उजेडात
आठवले म्हणाले, शिर्डी मधून आपण स्वतः आणि सोलापूर मधून राजा सरवदे हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असून आरपीआयला जागा न मिळाल्यास मोठी नाराजी पसरण्याची शक्यता आहे,जागा मिळणे हा आमचा हक्क आहे, जनता आम्हाला विचारत आहे. आम्हाला दोन जागा मिळाव्यात यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत.
हेही वाचा >>> सातारा:अजित पवारांसह जात्यंध पक्षां बरोबर गेलेले खासदार आमदार हे देश हिताचे नव्हे -श्रीनिवास पाटील
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर जरी राहुल गांधींच्या न्याय जोडो यात्रेच्या समारोपाला हजर राहिले असले, तरी महाविकास आघाडी मध्ये सहभागी होतील असे वाटत नाही आणि महाविकास आघाडी त्यांना घेणार ही नाही,तसेच प्रकाश आंबेडकर जर मोदींच्या विरोधात असतील तर मी मोदींच्या बाजूने भक्कमपणे उभा आहे. कर्नाटकमधील भाजपा खासदार अनंत हेगडे यांनी संविधानाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा मंत्री आठवले यांनी निषेध केला. संविधान कोणीही बदलू शकत नाही, मात्र हेगडे यांचे विधान निषेधार्य असून त्यांच्यावर कारवाईची मागणी भाजपाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.