वाई: हवामान क्षेत्रातील अत्याधुनिक संशोधनाचा आणि त्यातून दिल्या जाणाऱ्या अंदाजाचा देशभरातील शेतकरी आणि मच्छीमारांना फायदा होत आहे.मागील नऊ वर्षात या क्षेत्रात भारताने अधिक चांगली कामगिरी केल्याचे प्रतिपादन केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री कीरेन रीजीजू यांनी आज महाबळेश्वर येथे पत्रकार परिषदेत  केले.

महाबळेश्वर येथील अति उंचावरील मेघ भौतिकशास्त्र प्रयोगशाळेला भेट देऊन पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे ढगफुटी आणि भुकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीचाही पुरेशा वेळेआधी अचूक अंदाज लावण्यात आपली आश्वासक वाटचाल सुरू असून नजीकच्या भविष्यात त्या संकटांची देखील पूर्वसूचना देण्यात आपल्याला यश येईल आणि संभाव्य नुकसान टाळण्यास त्याची मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .त्यासाठी स्वदेशी बनावटीची यंत्रणा तयार केली जात असल्याचे रिजीजु म्हणाले.

harbhara farming
लोकशिवार: किफायतशीर हरभरा!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
farm distress maharashtra election
विधानसभा निवडणुकीत शेतीचे मुद्दे किती प्रभावी? राज्यातील शेतीची सद्यस्थिती काय?
Rashtriya Swayamsevak Sangh
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ; शतकानंतरची वाटचाल!
Steering Committee Approves Maharashtra Revised Curriculum with CBSE Influence
लेख : देशांतर्गत वसाहतीकरणाचा ‘आराखडा’!
objective of implementing the mgnrega
लेख : ‘मनरेगा’च्या मूळ हेतूंकडे दुर्लक्ष नको!
MSP on agricultural produce
विश्लेषण : शेतमालाचे जाहीर हमीभाव शेतकऱ्याला प्रत्यक्षात मिळतात का?
Rajeev patil
आईने घातलेल्या भावनिक सादेमुळे माघार; निवडणूक लढवणार नाही – राजीव पाटील

हेही वाचा >>> प्रत्येक जिल्ह्यात ‘जिल्हा रुग्णालय’ स्थापन करण्याची आरोग्य विभागाची महत्त्वाकांक्षी योजना!

देशातील सर्व पायाभूत सुविधा नैसर्गिक आपत्तीला सक्षमपणे तोड देणाऱ्या असाव्यात यादृष्टीने नियोजन सुरू असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील भारताने पुढाकार घेतला असल्याचे रिजिजू यांनी सांगितले. महाबळेश्वर हे देशातील उत्तम पर्यटन स्थळांपैकी एक असून आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र म्हणून ते नावारूपाला यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली . इथल्या स्ट्रॉबेरी च्या उत्पादन वाढीसाठी हवामान विभाग महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास त्यानी व्यक्त केला. खेलो इंडिया च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जी क्रीडा संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न केला त्याचे परिणाम आशियाई स्पर्धेत दिसत असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा >>>“अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मी…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य चर्चेत, फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाल्या…

तत्पूर्वी आज सकाळी रिजिजू यांनी महाबळेश्वर इथल्या अती उंचावरील मेघ भौतिकशास्त्र प्रयोगशाळेला भेट देऊन पाहणी केली .या प्रयोगशाळेत ढग आणि हवेत तरंगणाऱ्या कणपुंजांचे नमुने घेणारे प्रोब, व्हिडिओ,इम्पॅक्ट डिसड्रोमीटर, जीपीएस रेडियोसोन्डे, मायक्रोवेव्ह रेडियोमेट्रिक प्रोफायलर इ. उपकरणे सातत्याने कार्यरत आहेत. या भेटीदरम्यान रीजिजू यांनी केंद्रातील विविध विभागांची पाहणी केली आणि त्यांची कार्यप्रणाली जाणून घेतली . केंद्राचे प्रकल्प संचालक डॉ. जी . पांडिदुराई यांनी त्यांना या प्रयोग शाळेतून सुरू असलेल्या संशोधन कार्याची माहिती दिली .त्यानंतर रीजिजु यांनी केंद्रातील शास्त्रज्ञांशी अनौपचारिक संवाद साधला .रिजिजु यांच्या हस्ते यावेळी केंद्राच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.